अमळनेरात मराठी वाड्•मय मंडळातर्फे ग्रंथालय वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन साजरा

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । मराठी वाड्•मय मंडळ, अमळनेर यांच्या वतीने प्रा. आप्पासाहेब र. का. केले ग्रंथालयाचा वर्धापन दिन आणि जागतिक रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनी केले होत्या. त्यांच्या हस्ते प्रा. आप्पासाहेब केले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य नाथा चितळे लिखित ‘बालनाट्यसंहिता’चे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमात बासरीवादक योगेश पाटील यांनी सुरेल बासरी वादन करून कार्यक्रमाला सुंदर सुरुवात दिली. त्यानंतर संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, भाऊसाहेब देशमुख, बन्सीलाल भागवत, विवेक भांडारकर, प्रा. यू. जी. देशपांडे, स्नेहा एकतारे व अरुणा विंचूरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्यामकांत भदाणे, अजय केले, विनिता केले, प्रा. डॉ. माहेश्वरी, प्रदीप साळवी, डॉ. रविंद्र कुलकर्णी, कांचन शहा, सोमनाथ ब्रह्मे, प्रा. विजय तुंटे, डॉ. महेश पाटील, ॲड. के. व्ही. कुलकर्णी, अनिल सोनार, दिनेश नाईक, हनुमंत पाटील, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे, जगदीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैय्यासाहेब मगर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. श्याम पवार यांनी केले. मराठी वाड्•मय मंडळाचे पदाधिकारी, संचालक, सभासद, वाचक व रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी संस्कृती आणि रंगभूमीच्या गौरवाला अधोरेखित केले.






