Gold-Silver Rate | आजचे सोने-चांदीचे दर जाहीर, सोन्यात वाढ तर चांदी १.३० लाखांवर

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील सुवर्णप्रेमींसाठी आजचे सोनं-चांदीचे ताजे दर जाहीर झाले आहेत. भंगाळे गोल्ड (जळगाव व सावदा) यांच्या माहितीनुसार, सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असून चांदी तब्बल १.३० लाखांच्या पातळीवर पोहोचली आहे.
आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,०१,६७६, तर २४ कॅरेट सोनं प्रति तोळा ₹१,११,००० इतके झाले आहे. दरम्यान, चांदीचा दर प्रति किलो ₹१,३०,००० वर पोहोचला असून, मागील दिवसाच्या तुलनेत ₹५०० ची उसळी घेतली आहे.
सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांत हळूहळू वाढत असून गुंतवणूकदार सावधगिरीने व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, चांदीतील सलग वाढ लक्षवेधी ठरत असून लहान गुंतवणूकदारांचा कलही चांदीकडे वाढताना दिसत आहे.
भंगाळे गोल्डमध्ये दररोजचे अद्ययावत दर, आकर्षक दागिन्यांचे डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि पारदर्शक व्यवहार यामुळे ग्राहकांचा विश्वास कायम टिकून आहे.



