४५ दिवस मजूर ग्रामस्थ बनलेल्या ठाणे पोलिसांनी उत्तर प्रदेशात उधळला ड्रग्सचा कारखाना
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | देशभरात सध्या अंमली पदार्थ आणि ड्रग्सच्या विरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई करीत हजारो कोटींचे ड्रग्स हस्तगत केले असून ठाणे पोलिसांच्या स्पेशल पथकाने मोठी कामगिरी केली आहे. ठाण्यात पकडलेल्या १५ ग्रॅम ड्रग्सचा सूत्रधार शोधताना ठाणे पोलिसांचे विशेष पथक थेट उत्तरप्रदेशातील एका गावात पोहचले. तब्बल ४५ दिवस गावात ग्रामस्थ आणि मजूर म्हणून राहिल्यावर अखेर पथकाने सापळा रचला आणि उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने कारखान्यावर छापा टाकला. पथकाने तब्बल २८ कोटींचे ड्रग्स आणि साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, कासारवडवली पो.स्टे. ठाणे गु.रजि.क्र. १८६/२०२४, एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८ (क), २२ (ब), २२ (क), २९ हा गुन्हा दि २४/०१/२०२४ रोजी दाखल आहे. गुन्हे शाखा घटक-१ ठाणे यांनी गुन्हयाचा तपास करून, २४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या काळात आफताब अजीज मलाडा वय २२ वर्षे रा.ठि. ए/३०१, पाम कोर्ट अपार्टमेंट नालासोपारा, वसई, जयनाथ चंद्रबली यादव उर्फ कांचा वय २७ वर्षे, रा.ठि.- सागर अपार्टमेंट नालासोपारा वसई, शेरबहादुर राधेश्याम सिंग उर्फ अंकीत वय २३ वर्षे, रा. ठि.- शिवदर्शन बिल्डींग, ओसवाल नगर, नालासोपारा, वसई आणि हुसेन सलीम सैय्यद, वय ४८ वर्षे, रा.ठि. ओमकार अपार्टमेंट राजन पाडा, नालासोपारा वसई यांना अटक करून त्यांचेकडून ४८१ कि.ग्रॅ. वजनाची १४ लाख ५ हजार किंमतीचा एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला होता.
४५ दिवस गावात केली रेकी
पोलिसांनी अटक आरोपींकडे केलेल्या तपासात ओम गुप्ता उर्फ मोनु हा निष्पन्न होवून, तो त्याचे इतर साथीदार यांनी वाराणसी, उत्तरप्रदेश येथील भगवतीपुर गांवात प्रदीप प्रजापती यांचे मालकीचे घरात एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरू केला असल्याची माहिती मिळाली, त्याप्रमाणे गुन्हयाच्या तपास अधिकारी स.पो.नि. रूपाली पोळ, पो.शि. विजय यादव यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे, ओम गुप्ता उर्फ मोनु याचा आणि त्याचे कारखान्याचा शोध घेण्यासाठी तब्बल दिड महिन्यापासुन बेमालुमपणे वेषांतर करून ग्रामस्थ आणि मजूर म्हणून फिरत भगवतीपुर सारख्या खेडेगांवात जावून ओम गुप्ता उर्फ मोनु याच्यासह एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर तयार करण्याच्या कारखान्याचा शोध लावला.
अडीच कोटींची मिळाली अंमली पावडर
पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री दिलीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा घटक-१ ठाणे, सपोउपनिरी रविंद्र पाटील आणि पो. हवा अमोल देसाई, दोघे नेमणुक गुन्हे शाखा घटक-२ भिवंडी आणि पो. हवा. प्रशांत निकुंभ यांच्या पथकासह दि.१६ मार्च रोजी भगवतीपूर (मझवा), पिंढरा, जि.वाराणसी या ठिकाणी एस.टी.एफ.ऑफीस वाराणसी येथील पोलीस निरीक्षक अनिलकुमार सिंह व स्टाफ आणि दोन पंच यांचेसह कारखान्यावर छापा कारवाई करून त्या ठिकाणाहुन अतुल अशोककुमार सिंह वय ३६ वर्षे, रा.ठि.- मुळ गांव पुआरी खुर्द, पो. पुआरी कला ता. पिंढरा, जि. वाराणसी, उत्तरप्रदेश, संतोष हडबडी गुप्ता वय ३८ वर्षे, रा.ठि. तिवारीपुर, पो. पुआरीकला, ता. पिंढरा, जि. वाराणसी, उत्तरप्रदेश यांना “एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर हा अंमली पदार्थ” तयार करताना त्यांचेकडील साधन सामग्रीसह रंगेहाथ पकडले आहे. पथकाने तेथील कारखान्यासह तेथे असलेल्या चारचाकीमधून २ किलो ६४५ कि.ग्रॅ. वजनाचे २ कोटी ६४ लाख ५० हजारांचे एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर मिळून आलेला आहे.
२८ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
तसेच पथकाला कारखान्यात Mephedrome, Methylamine, Sodium Hydroxide Pellets, Chloroform, Hydrocloric Acid, Methylapropi hinon powder, Hot air Oven, Jar, Magnetic Laper, Mini ortark mixer, Sterror rod with moter असे रासायनिक पदार्थ आणि साधन सामग्री मिळून येवून यासह त्यांचे कारखान्यातील विविध रासायनिक द्रवपदार्थांचे बनवुन ठेवलेल्या मिश्रणांतुन २५ कोटींचे २५ किलोग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर तयार होते असे मिश्रण मिळून आले. पथकाने कारखान्यातून एकूण २७ कोटी ७८ लाख ५५ हजार किंमतीचा मुद्देमाल आणि ८ लाख ६२,l हजार ९०२ रुपयांची एम.डी. (मेफेड्रोन) क्रिस्टल पावडर बनविण्याची साधन सामग्री आणि कार क्रमांक एमएच.४८.एस.७३९० ही अंदाजे रक्कम ७ लाख रुपये किमतीची कार जप्त केली आहे. अशाप्रकारे आजपावेतो गुन्हयाच्या केलेल्या तपासात एकूण २७ कोटी ८७ लाख १७ हजार ९०२ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना दि.१७ मार्च रोजी वाराणसी न्यायालयासमक्ष हजर करून त्यांची ट्रान्झिट रिमांड घेण्यात आली आहे.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा ठाणे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त शोध-१ गुन्हे शाखा ठाणे निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा घटक १ ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी, स.पो.नि. रूपाली पोळ, पोउनि आनंदा भिलारे, सपोउनि रविंद्र पाटील, सपोउनि नरसिंग महापुरे, सपोउनि राजेंद्र संदानशिवे, पो.हवा. अमोल देसाई, पो. हवा. विश्वास मोटे, पोहवा उमेश जाधव, पो.हवा.नितीन ओवळेकर, पो.हवा. प्रशांत निकुंभ, पो.हवा. दिपक जाधव, पो.हवा. नंदकुमार पाटील, पो.ना. गणेश बडगुजर आणि विजय यादव आणि ए.एच.टी.सी. गुन्हे शाखा ठाणे यांनी केली आहे. कार्यवाही दरम्यान, स्पेशल टास्क फोर्स वाराणसी, उत्तरप्रदेश येथील अपर पोलीस अधीक्षक विनोदकुमार सिंग, पोलीस निरीक्षक अनिलकुमार सिंग, पोलीस उप निरीक्षक, मनिष श्रीवास्तव, हवालदार अरविंदकुमार पाठक, बैजनाथ राम, रणविजय तिवारी, अजयकुमार जयस्वाल, अवनिशकुमार सिंह यांची मदत झाली.
पहा संपूर्ण व्हिडिओ :