तीन दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला दोन रात्र जागून पकडले
महा पोलीस न्यूज | १२ एप्रिल २०२४ | जळगाव जिल्ह्यातील अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या ३ गुन्ह्यातील आरोपीला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. काही दिवसापूर्वी त्याच्या दोन साथीदारांना अटक करण्यात आली होती.
जिल्हयात मोटार सायकल चोरीच्या वाढलेल्या घटनांमध्ये दुचाकी चोरी करणारे व गुन्ह्यात पाहीजे असलेल्या आरोपींवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी केलेलया मागदर्शन व सुचनानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या आधारवरून पथकाला सूचना केल्या होत्या.
अमळनेर पोस्टेला दाखल असलेला रेकॉर्डवरील आरोपी आकाश विठ्ठल कोळी रा. रिधुर ता.जि. जळगांव हा रात्री अपरात्री विदगाव, कानळदा, रिधुर भागात येत जात असतो अशी माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेकडील अंमलदार जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, चालक अमंलदार भारत पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने त्या भागात सलग दोन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन त्याला ताब्यात घेतले.
आरोपीला पुढील कारवाई कामी अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीचे इतर दोन साथीदार यांच्याकडून यापुर्वी ३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पथकाने काही दिवसांपुर्वी अमळनेर पोस्टे कडील ३ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले होते .