Politics

वयोवृद्ध आजीने अनिल चौधरींचे नाचत-गाजत केले स्वागत

पिंप्री-मंगरूळ गटात अनिल चौधरींच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद

महा पोलीस न्यूज । दि.१३ नोव्हेंबर २०२४ । प्रहार जनशक्ती पक्ष परिवर्तन महाशक्तीचे रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी हे प्रचारार्थ फिरत असताना अनिल भाऊच आमचा लाडका मुलगा असून तोच नेहमी आमची विचारपूस करीत असतो. आमचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी असून त्याचा विजय निश्चितच आहे असा आशीर्वाद वयोवृद्धांनी दिला.

रावेर-यावल विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांचा ग्रामीण भागात प्रचार सुरु असून बॅट हे त्यांचे चिन्ह आहे. अनुक्रमांक ४ बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून यंदा परिवर्तन घडवा असे आवाहन गावोगावी ते मतदारांना करीत आहे. बोरखेडा गावातून प्रचाराला सुरुवात केल्यानंतर अनिल चौधरींनी तामसवाडी, भोकरी, केऱ्हाळा, पिंप्री, मंगरूळ, मोहगन, रामजीपूर, बक्षीपूर, खिरोदा, रसलपूर गावात दिवसभरात प्रचार केला.

घोषणांनी वेधले लक्ष
गावागावात भगिनी अनिल चौधरींचे औक्षण करून शुभेच्छा देतांना दिसून आल्या. प्रचारात ठिकठिकाणी अनिल चौधरी यांचे फुलांनी स्वागत केले जात होते, अनिल भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. एकच वादा, अनिल दादा, बहुत हुयी सबकी बारी, अबकी बारी, अनिल चौधरी अशा घोषणांनी समर्थकांनी प्रचारात धूम केली. ढोल-ताशांच्या गजरात रॅली एका गावातून दुसऱ्या गावात प्रचारार्थ जात होती.

आजीबाईंनी आनंदाने धरला ठेका
अनिल चौधरी प्रचारार्थ एका गावात पोहचले असता ७० वर्षीय वयोवृद्ध आजींनी अनिल चौधरींच्या स्वागतार्थ ढोल-ताशांचा गजरात ठेका धरला. आमचा अनिल भाऊ यंदा आमदार होणार म्हणत आजींनी आनंदाने अनिल चौधरींचे स्वागत केले. ठिकठिकाणी अनिल चौधरी यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते. वयोवृद्धांचा आशीर्वाद मला नक्कीच विजयी करणार असा आशावाद अनिल चौधरी यांनी व्यक्त केला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह
प्रचारात फिरोज शेख, गणेश बोरसे, राम कुकडे, गोकुळ कोळी, कल्पेश खात्री खत्री, करीम मन्यार, भरत लिधुरे, विलास पांडे, बिलाल शेख, तुकाराम बारी, नंदकिशोर सोनवणे, विकास पाटील, खेमचंद कोळी, सचिन झाल्टे, लतीफ खान, शुभम पाटील, सागर चौधरी, मनोज करंकाळ, दिलीप बंजारा, विनोद कोळी, अनिल चौधरी, अय्युब पहेलवान, मोहसीन शेख, विजय मिस्तरी, रवी महाजन, हाजी हकीम सेठ, राकेश भंगाळे, अनंत जोशी, बंटी मंडवाले, विक्की काकडे, सचिन कोळी, रमजान तडवी, रोनक तडवी, सुधाकर भिल्ल, सचिन महाजन, संतोष चौधरी, चेतन वायकोळे, गोलू मानकर यांच्यासह रावेर व यावल तालुक्यातील पदाधिकारी व परिवर्तन महाशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button