Politics

शिवसेनेत पक्ष प्रवेशासाठी लागलेली रीघ ही भाजपाला धोक्याची घंटा : संजय सावंत

भारावून न जाता भानावर राहून विजयश्री खेचून आणू : करन पवार

महा पोलीस न्यूज | १६ एप्रिल २०२४ | भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी नाही तर माझ्या खानदेशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.

चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात आज सकाळी दहा वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट, सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांचा खासदार उन्मेश पाटील व परिवाराच्या वतीने शिवप्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक लोकसभा समन्वयक महेंद्र बापू पाटील यांनी केले. खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले की, आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मेळाव्यात पक्ष प्रवेशासाठी तालुक्यातून हजारो नागरिकांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केल्याने अक्षरशः प्रवेश सोहळा थांबवण्यात आला. ही कार्यकर्त्यांची गर्दी पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे करण पवार हे मोठ्या मताधिक्य घेऊन निश्चित विजयी होतील असा मला विश्वास असल्याचे प्रतिपादन खासदार उन्मेश पाटील यांनी केले.

यावेळी तालुक्याभरातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी बघावयास मिळाली तालुक्यातून ग्रामपंचायत सदस्य, विका सोसायटी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश करीत उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधून उबाठामध्ये प्रवेश केला.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, लोकसभा समन्वयक गुलाबराव वाघ, सह संपर्क प्रमूख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख ऍड.आर एल नाना पाटील, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, तालुका निरीक्षक ऍड.अभय पाटील, लोकसभा समन्वयक महेंद्रबापू पाटील, शहराध्यक्ष नाना कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव नाना खलाणे, माजी नगरसेवक नंदू बाविस्कर, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मार्केटचे माजी संचालक धर्माबापू काळे, युवा सेनेचे प्रशांत कुमावत, तालुका संघटक सुनील गायकवाड, ज्येष्ठ कार्यकर्ते मदन बैरागी, उमंग महीला समाजसृष्टी परिवाराच्या संस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील, महिला आघाडीच्या प्रमुख सविता कुमावत, ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम पाटील मजरेकर, माजी नगरसेवक संजय ठाकरे, युवा सेना तालुकाप्रमुख किरण घोरपडे, शहर प्रमुख रॉकी धामणे, महिला आघाडी सुंनदा काटे, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, विद्यार्थी सेनेचे महेंद्र जयस्वाल, रेल प्रवासी सेनेचे किरण आढाव, युवा सेनेचे रविभाऊ चौधरी, उपतालुका प्रमुख हिमंत निकुंभ, उपतालुका प्रमुख अनिल राठोड, माजी पंचायत सदस्य संजय पाटील, गटप्रमुख अशोक सानप, रोहीत जाधव, वसिम चेअरमन, पप्पू राजपूत, योगेश राठोड, उज्वला जगदाणे, रील स्टार दिपक खंडाळे, ज्ञानेश्र्वर देवरे, विभाग प्रमूख दिलीप पाटील, पद्माकर पाटील, सभापती सुनिल पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य रवीभाऊ चौधरी, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.

कोणी काहीही म्हणो आमचं पक्क ठरलय : राजीव देशमुख*
शिवसेनेच्या मेळाव्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मेळावा संपन्न झाला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार राजीव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस पक्षाने हातात हात घालून काम करण्याचे ठरवले असून महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांचा विजय निश्चित आहे. कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर जाऊन मतदार राजाला मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी पार पाडायची आहे. कोणी काही म्हणो आपलं पक्क ठरलयं अब की बार करण पवार असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.

याप्रसंगी जेष्ठ पत्रकार तथा सरपंच संघटनेचे राज्य पदाधिकारी किसनराव जोर्वेकर, महानंद संचालक प्रमोदबापू पाटील, जि.प सदस्य शशिभाऊ साळुंखे,जि.प सदस्य भूषण पाटील, प स सदस्य बाजीराव दौंड, प.स.सदस्य शिवाजी सोनवणे, विष्णू चकोर, नगरसेवक रामचंद्र जाधव, प्रदीप निकम, शाम देशमुख, शेखरनाना देशमुख, भूषण ब्राह्मणकर, जगदीश चौधरी, भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते सतीश दराडे , योगेश पाटील, अजय जाधव , सुरेश पगारे, शेनपडू पाटील, शरदसिंग राजपूत, सचिन बाविस्कर, संजय राठोड, अमोल भोसले, शुभम पवार, मोहित भोसले, गोटीराम राठोड, अभिजित शितोळे, पिनू सोनवणे, पंजाबराव देशमुख, गौरव पाटील, गणेश महाजन, भूषण आव्हाड, प्रदीप पाटील, प्रतीक पाटील, हेमंत जाट, सूरज शर्मा, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी अशोकराव खलाणे, रमेश शिंपी, अर्चनाताई पोळ, शेकापचे गोकुळ पाटील सर आदि मान्यवर उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button