Detection

बिग ब्रेकिंग : मध्यप्रदेशात वाघाची शिकार, जळगावात कातडीसह ६ आरोपी ताब्यात

महा पोलीस न्यूज । २६ जुलै २०२४ । वाघाची शिकार करुन कातडी विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणाऱ्या ६ संशयितांना जळगांव वनपरिक्षेत्रातील नशिराबाद टोल नाका येथे पुणे कस्टम अधिकारी व जळगांव कस्टम अधिकारी यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. पथकाने संशयितांकडून वाघाची कातडी आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगांव वनपरिक्षेत्रातील नशिराबाद टोल नाका येथे वाघाच्या कातडीची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पुणे कस्टम अधिकारी व जळगांव कस्टम अधिकारी यांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी केलेल्या संयुक्त कार्यवाही दरम्यान वाघाच्या कातडीसह अजवर सुजात भोसले उ.व-३५ रा.हलखेडा ता.मुक्ताईनगर ह.मु.चांगदेव, मोहमंद अतहर खान उ.व-५८ रा.भोपाल जि.भोपाल (मध्यप्रदेश), नदीम गयासुद्दीन शेख उ.व-२६ रा.अहमदनगर जि.अहमदनगर, कंगनाबाई अजवर भोसले उ.व.-३० रा.हलखेडा ता.मुक्ताईनगर जि.जळगांव, तेवाबाई रहीम पवार उ.व-३५ रा.हलखेडा ता.मुक्ताईनगर जि.जळगांव, रहिम रफिक पवार उ.व-४० रा.हलखेडा ता.मुक्ताईनगर जि.जळगांव यांना ताब्यात घेण्यात आले.

पथकाने संशयित आरोपींकडून गुन्हयात वापरण्यात आलेले ५ मोबाईल व २ मोटार सायकल आणि इतर साहित्य कस्टम अधिकारी पुणे विभाग श्री.रविरंजन व त्यांचे सहकारी तसेच कस्टम अधिकारी जळगांव विभाग शाम कोटावळे यांच्या मार्फत जप्त करण्यात आले. पुढील अधिक तपासकामी सिमा शुल्क विभाग पुणे व जळगांव यांनी कारवाई बाबत उपवनसंरक्षक, जळगांव वनविभाग जळगांव यांना सुचित केले असता, माहितीच्या आधारावर सहा आरोपीना जळगांव वनविभागाकडुन अटक करण्यात आलेली आहे.

वाघाची शिकार कुठे झाली? आणि वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती? याचा तपास सुरू आहे. सत्यता तपासण्यासाठी त्वचेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. प्राथमिक माहितीच्या आधारे वाघाची मध्यप्रदेशात शिकार केल्याचा अंदाज आहे, त्यामुळे या वाघ शिकार प्रकरणाच्या तपासाबाबत उप वनसरंक्षक जळगाव प्रवीण ए. हे मध्य प्रदेश वन विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या संपर्कात आहेत.

सर्व संशयीत आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून वन गुन्हयातील पकडण्यात आलेली कातडी हि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या सुची-१ मध्ये येत असुन हे कृत्य हे दंडनिय अपराध आहे. हा वन गुन्हा दखलपात्र व अजामिनपात्र आहे. गुन्ह्याची पुढील चौकशी श्रीमती नीनु सोमराज, वनसंरक्षक धुळे, प्रविण ए., उपवनसंरक्षक जळगांव, आर.आर.सदगीर, विभागीय वनाधिकारी (दक्षता) धुळे, यांचे मार्गदर्शनाखालील उ.म.बिराजदार, सहा. वनसंरक्षक जळगांव व नितीन अशोकराव बोरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी जळगांव प्रादेशिक हे करीत आहे. संपूर्ण कार्यवाही विवेक देसाई यांचे उपस्थितीत करण्यात आली.

नागरिकांनी अवैधरित्या वन्यप्राणी ताब्यात ठेवू नये. तसेच त्यांची खरेदी अथवा विक्री करुन नये, असे बेकायदेशीर कृत्य आढळल्यास टोल फ्री क्रमांक १९२६ वर संपर्क करावा, असे आवाहन जळगांव वनविभागामार्फत नागरीकाना करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button