Other

महिला दिनानिमित्त कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिलांचा गौरव

महिला दिनानिमित्त कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिलांचा गौरव

महाराष्ट्र सुवर्णकार सेना व महिला मंडळाच्या वतीने सन्मान

जळगाव | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सुवर्णकार सेना, जळगाव जिल्हा, अहिर सुवर्णकार महिला मंडळ तसेच ऋणानुबंध वधू-वर पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कर्तव्यदक्ष ट्रॅफिक पोलिस महिला अधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. यावेळी सुगंधी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या सेवेला सलाम करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते सन्मान
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका रंजना वानखेडे तसेच पोलीस निरीक्षक पवन देसले यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते कर्तव्यपरायण महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

या महिला अधिकाऱ्यांचा झाला गौरव
कार्यक्रमात ट्रॅफिक विभागातील महिला पोलिस अधिकारी मोनाली कळसकर, सविता परदेशी, शैला धनगर, नंदा सुरवाडे, वैशाली पाटील आणि रंजना बट्टीसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी या महिला अधिकारी करत असलेल्या सेवेला यावेळी उपस्थितांनी दाद दिली.

या प्रसंगी अहिर सुवर्णकार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष संगीता विसपुते, कविता पगार, कांचन विसपुते तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, सचिव संजय पगार, समिती प्रमुख बापू रणधीर यांच्या हस्तेही महिला पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला रत्नाकर दुसाने, दीपक जगदाळे, सुरेश सोनार, बबलू बाविस्कर, मनोज सोनार, पंकज रणधीर, जितेंद्र देवरे, महेश विसपुते, रवींद्र रणधीर आदी मान्यवर उपस्थित होते.

नारीशक्तीचा गौरव
समाजाच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांच्या समर्पित सेवेला सलाम करत त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव या कार्यक्रमातून करण्यात आला. उपस्थितांनी नारीशक्तीला वंदन करत महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button