अरे बापरे.. ट्रकमधून निर्दयीपणे १८ म्हशींची वाहतूक
महा पोलीस न्यूज | २५ फेब्रुवारी २०२४ | गुरांची अवैध वाहतूक करत असलेल्या एका आयशर ट्रकसह १८ म्हशी असा सुमारे साडे नऊ लाखाचा मुद्देमाल रावेर पोलीसांनी जप्त केला. याबाबत चालकास अटक करून रावेर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, रावेर पालरोड वरील कुर्शिदशा वली दर्गाजवळ अवैध म्हशींची वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एमएच.१८.बीझेड.८४८४ पोलिसांनी पकडला. ट्रकमध्ये अवैधपणे कोंबून, निर्दयीपणे दोरीने घट्ट बांधून त्यांना कुठल्याही चारा, पाण्याची व्यवस्था न करता, पुरेशी जागा न ठेवता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्राशिवाय अत्यंत निर्दयतेने दबलेल्या १८ म्हशी आढळून आल्या. पोलिसांनी चौकशी करील एकूण ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १८ म्हशी व ५ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त केला आहे.
याबाबत पोलीस कॉस्टेबल मुकेश मेढे यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा अन्वये मुस्तफाखान अयुबखान (वय २३) रा. बालसमद ता.कसरावद, जि.खरगोन, मध्यप्रदेश यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार जगदीश पाटील करीत आहेत.