
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई (सेवानिवृत्त) नियम २०१९ नुसार, जळगाव जिल्हा पोलीस दलात संवर्गातील रिक्त १७१ पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या कार्यालयाने याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केली असून, इच्छुक उमेदवारांना २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात यंदा १५ हजार ६३१ पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून पोलीस शिपाई १२३९९, पोलीस शिपाई चालक २३४, बँड्समन २५, सशस्त्र पोलीस शिपाई २३९३, कारागृह शिपाई ५८० पदांसाठी भरती होणार आहे. जळगाव जिल्ह्यात विविध संवर्गात १७१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रिक्त पदांची तपशीलवार माहिती :
जिल्ह्यातील विविध श्रेणींनुसार रिक्त पदे खालीलप्रमाणे आहेत:
• एकूण रिक्त पदे: १७१
◦ खुला: ४२
◦ सर्वसाधारण: १३
◦ महिला ३०%: १३
◦ खेळाडू ५%: ०२
◦ प्रकल्पग्रस्त ५%: ०२
◦ भूकंपग्रस्त २%: ०१
◦ माजी सैनिक १५%: ०६
◦ अंशकालीन ५%: ०२
◦ पोलीस पाल्य ३%: ०१
◦ गृहसंक दल ५%: ०२
◦ अनाथ १%: ०० (महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ-२०२२/प्र.क्र.१२२/का-०३, दिनांक ०६.०४.२०२३ नुसार एकूण रिक्त पदांच्या १% इतकी पदे)
श्रेणीनिहाय आरक्षणानुसार पदे वाटप करण्यात आली असून, उमेदवारांना संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अर्ज करावा लागेल.
अशी आहे अर्ज प्रक्रिया :
• ऑनलाइन अर्ज कालावधी : २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५ (रात्री ११:५९ पर्यंत)
• वेबसाइट : policerecruitment2025.mahait.org किंवा www.mahapolice.gov.in
• उमेदवारांना संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज सादर करावा लागेल. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत डाउनलोड करून ठेवावी.
महत्त्वाच्या टीपा :
• जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती करणाऱ्या कोणत्याही पेशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी करणाऱ्या संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती लगेच पोलीस अधीक्षक, जळगाव यांना दुरध्वनी क्रमांक ०२५७-२२३१४७७ वर त्वरित संपर्क साधावा.
• संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक असून, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा.
उमेदवारांस पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या कार्यालयाने या भरतीसाठी तयारी करून ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी वरील संकेतस्थळांना भेट द्या.






