अमळनेरमध्ये बजरंग दलाचे भव्य ‘शौर्य संचलन’; जय श्री रामच्या जयघोषाने शहर दुमदुमले

अमळनेरमध्ये बजरंग दलाचे भव्य ‘शौर्य संचलन’; जय श्री रामच्या जयघोषाने शहर दुमदुमले
अमळनेर (प्रतिनिधी): शौर्य दिनाचे औचित्य साधून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद अमळनेर प्रखंडातर्फे शहरात भव्य ‘शौर्य संचलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. हातात भगवे ध्वज आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण शहर भगवेमय झाले होते. हिंदू समाजातील शौर्य आणि एकात्मतेचे दर्शन घडवणे हा या संचलनाचा मुख्य उद्देश होता.
शिस्तबद्ध संचलन आणि उत्साही सहभाग
संचलनाची सुरुवात [म्हसकर प्लॉट, स्वामीनारायण मंदीर, येथून सुरवात झाली करण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे शेकडो कार्यकर्ते पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. Dj च्या गजरात आणि शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या संचलनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून या संचलनाचे स्वागत करण्यात आले.
शौर्याचा वारसा जपण्याचा निर्धार
कार्यक्रमाच्या वेळी वंदनीय उपस्थित ह.भ.प. सुरेश महाराज सारवेकर व प्रमुख पाहुणे ओमप्रकाशजी मुंदडा , प्रखंड अध्यक्ष डॉ. संजयजी शहा तसेच प्रमुख वक्ते कृष्णाजी देशमुख यांनी शौर्य दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. “देशाचे संरक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तरुणांनी संघटित होणे काळाची गरज आहे,” तरूणाने निर्व्यसनी व्हावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. बजरंग दलाच्या वतीने दरवर्षी हा दिवस शौर्य आणि धैर्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो
या प्रसंगी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. संचलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अमळनेर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.






