Crime

उमरखेड परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक

डिटेक्शन ब्रँचच्या कारवाईत तलवार, चाकू, गुप्ती जप्त

उमरखेड परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक

डिटेक्शन ब्रँचच्या कारवाईत तलवार, चाकू, गुप्ती जप्त

उमरखेड प्रतिनिधी

पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत तलवार, चाकू आणि गुप्ती अवैधरीत्या बाळगणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई डिटेक्शन ब्रँच (DB) पथकाने गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल राज डिलक्स, उमरखेड येथे केली. आरोपींकडून शस्त्रांसह एकूण ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई

पोलीस अधिक्षक कुमार चिता यांच्या आदेशानुसार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली होती. ८ मार्च रोजी डिटेक्शन ब्रँचचे सपोनि पांडुरंग शिदे व पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उमरखेड शहरातील राज डिलक्स हॉटेलमध्ये काही इसम तलवार व चाकूसह असल्याची खबर मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी हॉटेलमालक श्री. पत्तेवार यांच्याकडून संशयितांची माहिती घेतली आणि रूम क्रमांक ११० मध्ये छापा टाकला. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे आढळून आली.

शेख अहेफज शेख फिरोज (वय १९, रा. अशोक नगर, यवतमाळ) – धारदार बटन चाकू (किंमत ₹१००/-) , बिलाल खान सलीम खान (वय १८, रा. अशोक नगर, यवतमाळ) – स्टीलची तलवार (किंमत ₹६००/-) , सैयद मुदसिर सैयद मजिद (वय १८, रा. झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड) – गुप्ती चाकू (किंमत ₹१००/-) या तिघांविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ४/२५ सह भारतीय दंड संहिता कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह

यांनी केली करवाई

ही यशस्वी कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधिक्षक पियूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग शिदे, पोउनि सागर इंगळे, पोहेका संदिप ठाकूर, पोशि संपशिल टेंभरे, पोशि आकाश पचार यांनी पार पाडली. पुढील तपास पोहेका संदिप ठाकूर करीत आहेत

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button