Education

उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये रंगला विज्ञान दिन, फूड फेस्टिवल!

महा पोलीस न्यूज | २ मार्च २०२४ | रावेर येथील उर्दू गर्ल्स हायस्कूल येथे विज्ञान दिन व खाद्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका नूरजहाँ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्ये आणि कोणत्याही कामाची जिद्द विकसित करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.

रावेर शहरातील उर्दू गर्ल्स हायस्कूलमध्ये नुकतेच शाळेच्यावतीने विज्ञान दिन व खाद्य महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या ‘विद्यार्थी गटाने’ खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला. त्याचा संपूर्ण खर्च विद्यार्थ्यांनीच उचलला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड.शेर अफगन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर रावेरचे गटशिक्षणाधिकारी शैलेश दखने, जी.एन.पाटील, रावेर उर्दू केंद्र प्रमुख रईस शेख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्ये आणि कोणत्याही कामाची जिद्द विकसित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फूड फेस्टिव्हल कार्यक्रमात इयत्ता ५ वी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पास्ता, भेळ-पुरी,पाणीपुरी, स्वीट-कॉर्न, टिक्की-चाट, सँडविच, समोसा, कचोडी, लिंबू सरबत, केळीचा शेक आणि मिल्क शेक असे विविध पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केले. यामुळे विद्यार्थी खूप उत्साही दिसले. अध्यक्ष ॲड.शेर अफगन आणि मंचावर उपस्थित पाहुण्यांनी स्वतः विद्यार्थ्यांनी लावलेल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला भेट देऊन सर्वांची पाहणी केली आणि तयार केलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी दहावीच्या विद्यार्थिनींना निरोपही देण्यात आला.

प्रसंगी ॲड.समशेर यांनी सर्व विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले की, उद्योजकता हा समाजाचा अविभाज्य घटक आहे.नवीन प्रयोग आणि संशोधन करण्याची आणि उपयुक्तता निर्माण करण्याची लोकांची क्षमता विकसित करून. रोजगाराच्या संधी वाढविण्याचे काम करते, असे ते म्हणाले.

उपक्रमाला नगरसेवक आशिफ मोहम्मद, रमजान शेठ, जी.एन. पाटील, जी.पी.चौधरी, नगरसेवक सादिक शेख, कलीम सदस्य, गयास शेख, युसूफ खान,अब्दुल मुत्तलिब, अब्दुल रफिक, कालू पैलवान, मंजूर मन्यार, शिक्षक सय्यद जाकीर, शकील, आबिद मोहम्मद, नगरसेवक शफी शेख, आरिफ टेलर, आरिफ भाई, मोहसीन, सय्यद जावेद, नगरसेवक असदुल्ला खान, नासिर खान सर, कौसर शेख व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सारुल्ला खान यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका नूरजहा यांनी केले. कार्यक्रमासाठी नबी सर, अजीम सर, सय्यद शकील सर, जाहिद सर, संजीदा, अल्ताफ शेख, आफताब शेख यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button