वैशाली सुर्यवंशी यांनी स्वीकारली करण पाटलांच्या प्रचाराची धुरा!
महा पोलीस न्यूज | २३ एप्रिल २०२४ | खान्देशातील प्रति पंढरपूर म्हणून ख्यात असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथे जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण बाळासाहेब पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांच्या प्रचाराची पाचोरा-भडगाव मतदारसंघातील धुरा ही ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सांभाळली असून त्यांनी आधीपासूनच मोर्चेबांधणी देखील केली आहे. तसेच, महाविकास आघाडीच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी प्रचार फेर्यांचे नियोजन देखील केले आहे. या अनुषंगाने आज पिंपळगाव हरेश्वर येथून करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराचा नारळ गोविंद महाराज यांच्या समाधीस्थळी फोडण्यात आला.
याप्रसंगी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून करण बाळासाहेब पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यात वैशाली सुर्यवंशी यांच्या सोबत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. यानंतर गावातून प्रचार फेरी निघाली.
याप्रसंगी जोरदार जयघोषणांनी परिसर अक्षरश: दुमदुमला. यात तुमची आमची निशाणी मशाल; दादांची आणि ताईंची निशाणी मशाल आदी विविध घोषणांनी गावकर्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रचार फेरीत ठिकठिकाणी वैशाली सुर्यवंशी आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत करण्यात आले. तर प्रचार फेरीतील मान्यवरांनी मतदारांना परिवर्तनासाठी साद घातली.
या प्रचार फेरीत वैशाली सुर्यवंशी यांच्यासह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उध्दव मराठे, शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख अरूण पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष अमजद पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे उपसजिल्हाप्रमुख (विधानसभा क्षेत्र) नितीन तावडे, तालुकाध्यक्ष विकास पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हरी पाटील, राकेश सोनवणे, अनिल सावंत, पप्पू राजपूत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत पाटील, संतोष कुटे, प्रशांत माळी, कॉंग्रेसचे विधानसभा प्रमुख प्रदीप पाटील, प्रताप पाटील, शेरखान मणियार, ज्ञानेश्वर पाटील, शेख ईस्माइल शेख फकीरा, राजेंद्र महाजन, प्रकाश चव्हाण, शरीफ खाटीक, निखील भुसारे, संदीप जैन, पिंपलगावचे सरपंच कैलाश अप्पा, ग्राम पंचायत सदस्य अजय तेली, राहुल बडगुजर, कोमल आबा, बि डी पाटील, कांग्रेस जेष्ठ नेते पि.एस.पाटिल, राजू महाजन, प्रकाश चव्हाण, किशोर गरुड़, राष्ट्रवादीचे संतोष कुटे, राजधर पाटिल, विश्वनाथ उभाले,जेष्ठ शिव सैनिक भास्कर नाना, गोविंद पाटिल,अरुण पाटील, मिलिंद देव ,भारत क्षीरसगार,निंबादास माली, राजू तेली, गजु पोतदार, तेजस पाटिल, राहुल चौधरी, भागवत पाटिल, तेजू नाना, अतुल सुर्यवंशी, तिलोत्तमा मौर्य, योजना पाटील, अनिता पाटील, जयश्री येवले, कुंदन पंड्या, रीना पाटील, नीता भंडारकर, मनीषा पाटील, उषा परदेशी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.