३६ वर्षीय महिलेचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ

३६ वर्षीय महिलेचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ
एका विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
भडगाव- प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून एका विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की- तालुक्यातील एका गावातील ३६ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी महिला घरात असतांना देखील त्याने घरात देवून फियांदीचा हात पकडला तसेच महिलेचा व तिच्या मुलीच्या पोटावर हात फिरवून मूलीचा विनयभंग केला यावेळी महिलेने घराचा दरवाजा आतुन बंद केला तरी आरोपीने दरवाज्यास लाथ मारुन
फिर्यादी महिलेस जातीवाचक शिविगाळ केली व तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.न.२४१/२०२५ भा.न्या.स.कलम ७४,३३३,३५१(२),३५२,पोस्को ८,१२ अ.जा.ज.प्र.का.कलम ३(१)(w)(i)(ii),३(२)(va),३(१)(r)(s), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे हे करीत आहेत.