विरोदा-रिधुरी रस्त्याचे स्वप्न आमदार अमोलभाऊ जावळेंच्या पुढाकारातून साकारणार

विरोदा-रिधुरी रस्त्याचे स्वप्न आमदार अमोलभाऊ जावळेंच्या पुढाकारातून साकारणार
लाडक्या बहिणींच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
विरोदा (ता. यावल) –रावेर मतदारसंघातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या विरोदा ते रिधुरी रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन नुकतेच परिसरातील लाडक्या भगिनींच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामामुळे ग्रामीण भागातील नागरिक व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या रस्त्यामुळे विरोदा, रिधुरी आणि परिसरातील इतर गावांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी सुकर मार्ग मिळेल. नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला गती येईल आणि आपत्कालीन सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचू शकणार आहे.
या कार्यक्रमात बोलताना आमदार अमोलभाऊ जावळे म्हणाले, “हा केवळ रस्त्याचा विकास नसून, रावेर मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीची सुरुवात आहे. मायबाप जनतेने भरभरून दिलेला पाठिंबा, विश्वास, आणि प्रेम — याचे उत्तर विकासकामांच्या माध्यमातून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२४ व प्रेरणादायी ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला.
या रस्त्यासाठी निधी मंजूर करून काम सुरू करण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय असून, यामुळे स्थानिक पातळीवर ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला शरद महाजन, नारायण चौधरी, आर. जे. पाटील, सचिन पाटील, भरत महाजन, गणेश नेहते, नरेंद्र नारखेडे, उमेश पाटील, जयश्री चौधरी, उमेश बेंडाळे, सागर कोळी, पिंटू तेली, डॉ. नरेंद्र कोल्हे, चिंतन जैन, भरत पाटील, किशोर पाटील, मछिंद्र चौधरी, जीवन तायडे, विनोद झाल्टे, पंकज बऱ्हाटे, पूनम चौधरी, मीना बाई बऱ्हाटे, देवयानी चौधरी, तिलोत्तमा चौधरी, रूपाली सोनवणे, अमोल वारके, सतीश बऱ्हाटे, सतीश चौधरी, वसीम पिंजारी, कमलाकर चौधरी, सुनील चौधरी, रवींद्र खाचणे, योगेश चौधरी, दिलीप चौधरी, चंदू वारके, मुकेश कोळी, लीलाधर चौधरी, प्रकाश कपले, नंदू सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.