Crime

मद्यविक्री दुकानातून १० लाखांचा मद्यसाठा चोरी; मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगरहून अटक

मद्यविक्री दुकानातून १० लाखांचा मद्यसाठा चोरी; मुख्य आरोपीला छत्रपती संभाजीनगरहून अटक

जळगाव : शहरातील इच्छादेवी चौकाजवळील अशोका लिकर गॅलरी या मद्यविक्रीच्या दुकानातून सुमारे १० लाख रुपये किमतीचा मद्यसाठा चोरीला गेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलीम उमर पठाण (वय ३५, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून एक चारचाकी वाहन जप्त केले असून, या गुन्ह्यात इतर तीन संशयितांचेही नाव निष्पन्न झाले आहे.

अशी रचली चोरीची योजना
२३ एप्रिल रोजी इच्छादेवी चौकातील पोलिस चौकीपासून काही अंतरावर असलेल्या अशोका लिकर गॅलरीमधून चोरट्यांनी मद्याचे बॉक्स चोरून नेले होते. तपासात समोर आले की, आरोपी पठाण याने पडेगाव येथून एक वाहन भाड्याने घेतले होते. त्याच वाहनाचा वापर करून चोरीचा मद्यसाठा छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आला.

त्यानंतर तेथे मालेगाव येथील दुसऱ्या टोळीच्या मदतीने मद्यसाठा दुसऱ्या वाहनात भरून स्थलांतरित करण्यात आला, अशी माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उर्वरित तीन संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही ताब्यात घेतले जाणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button