महिलांनी हाताळले पोलीस ठाण्याचे कामकाज
महा पोलीस न्यूज | ८ मार्च २०२४ | जागतिक महिला दिनानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्यात आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. महिला दिनी पोलीस ठाण्याचे प्रभारी ते इतर कामकाज महिला कर्मचाऱ्यांनी हाताळले. सर्व महिला कर्मचारी आणि सफाई काम करणाऱ्या महिलांचा पोलीस अधिकाऱ्यांनी सत्कार केला.
जागतीक महीला दिनानिमित्त एमआयडीसी पोलीस ठाण्याचा कारभार हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला काम करणाऱ्या महीला अंमलदारांच्या हाती सोपविण्यात आला होता. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून महिला हवालदार निलोफर सैय्यद यांनी कामकाज पाहीले तर दुय्यम अधिकाऱ्याची जबाबदारी असताना तडवी यांनी पार पाडली.
महिला हवालदार सुनंदा तेली यांनी ठाणे अंमलदार म्हणून काम केले. महिला कर्मचारी सपला येगुंटला यांनी सीसीटीएनएसचे तर हसीना तडवी यांनी ऑफिस हजरचे कामकाज केले. प्रसंगी पोलीस स्टेशनला सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लिलाबाई म्हस्के, निर्मलाबाई तायडे, बनाबाई जाधव आणि महीला अंमलदार यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी सत्कार केला.