जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक जगताप ; उपाध्यक्षपदी दिलीप सोनवणे

जळगाव शहर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या अध्यक्षपदी विवेक जगताप ; उपाध्यक्षपदी दिलीप सोनवणे
जळगाव प्रतिनिधी I श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था जळगाव यांची नुकतीच कार्यकारी मंडळाची बैठक शिंपी समाजाच्या श्रीमती मनोरमा बाईं जगताप सामाजिक सभागृह येथे मावळते समाज अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीमध्ये सन 2025 ते 2028 या वर्षासाठी जळगाव शहर समाजाअध्यक्षपदी विवेक जगताप यांची बिनविरोध निवड कार्यकारणी सभेत करण्यात आली. या प्रसंगी विवेक जगताप यांनी उपस्थित सर्व कार्यकारणी सदस्य यांच्या आशीर्वाद घेऊन सांगितले की माझे वडील सुद्धा या संस्थेचे अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय अध्यक्ष झाले जे सहकार्य आपण सर्वांनी त्यांना दिले त्यांचं प्रमाणे मला आपले सर्वांचे सहकार्य व आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहील या अपेक्षेने आपण भविष्यात सर्वांना घेऊन कार्य करू अशी त्यांनी सांगितले .
नविन कार्यकारणी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष – मनोज भांडारकर ,उपाध्यक्ष -दिलीप सोनवणे ,सचिव -अनिल खैरनार , कोषाध्यक्ष -चेतन खैरनार सहसचिव- दीपक जगताप , वसतिगृह प्रमुख -प्रदीप शिंपी , प्रसिद्धीप्रमुख – गणेश सोनवणे यांची पदाधिकारी म्हणून निवड केली. तसेच सदस्य म्हणून राजेंद्रकुमार सोनवणे मुकुंद मेटकर ,राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, सुरेश सोनवणे ,सतीश पवार अरुण मेटकर ,दिलीप भामरे ,सुनील बाविस्कर, बापू खैरनार ,यांची सदस्य म्हणून निवड केली. लवकरच युवक मंडळ , महिला अध्यक्ष ,व शाखा अध्यक्ष यांची निवड प्रक्रिया शहरातील प्रत्येक भागात जाऊन बैठक घेउन त्यांची निवड करण्यात येईल असे त्यांनी या प्रसंगी सांगितले. जळगाव शहरातील सर्व सामाजिक संस्थांना संस्थेच्या बरोबर घेऊन भविष्यात मोठे कार्य हाती घेण्याचा मानस त्यांनी या प्रसंगी केला व मीटिंग अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न होऊन अध्यक्ष व नूतन कार्यकारिणीचा स्वागत व अभिनंदन करण्यात आले.






