श्री संताजी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

श्री संताजी महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
‘सक्षम सशक्त महिला, सक्षम समाज’ या थीमवर विविध उपक्रमांचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी: श्री संताजी महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून झेप फाउंडेशनच्या सर्वेसर्वा डॉ. रेखाताई चौधरी, अनिताताई चौधरी, रेणुकाई हॉस्पिटलच्या ससंचालिकाहो. सोनल महाजन, डॉ. अरुणाताई चौधरी आणि नगरसेविका अपूर्वा चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आशालता चौधरी होत्या.
या वर्षी महिला आणि बालिकांच्या सक्षमीकरणावर भर देत मंडळाच्या अध्यक्षा निता शिरसाळे आणि उपाध्यक्षा ताराताई चौधरी यांच्या संकल्पनेतून “सक्षम सशक्त महिला, सक्षम समाज” या थीमवर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजुषा चौधरी, अनिता चौधरी, स्वाती चौधरी, सरळा चौधरी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन टिना चौधरी, तर आभार प्रदर्शन विशाखा चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रत्ना चौधरी, रेखा बागुल, आशा चौधरी, रंजना चौधरी, शुभांगी चौधरी, अनिता चौधरी यांनी परिश्रम घेतले.






