Crime
जळगावातील ९ पोलीस अंमलदारांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत मोठे फेरबदल करण्यात आले असून, जिल्ह्यातील नऊ पोलीस अंमलदारांची आर्थिक गुन्हे शाखेत (Economic Offence Wing) बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १८ ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश काढले आहेत.
बदली झालेल्या अंमलदारांची नावे: सहायक फौजदार विजय निकुंभ (शहर पोलीस ठाणे)पोलीस हवालदार सचिन चौधरी (बोदवड) ,सुनील बडगुजर (शहर पोलीस ठाणे) ,शैलेश चव्हाण (पोलीस मुख्यालय) ,किरण पाटील (सावदा) संजय भालेराव (जिविशा) ,विशाल तायडे (पोलीस मुख्यालय),विकास पहूरकर (जिल्हापेठ पोलीस ठाणे) नवल हटकर (चाळीसगाव ग्रामीण) या बदल्यांमुळे आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे






