Crime

मिस कॉल आणि ‘मनमंदिर’मध्ये फुललेला वेश्या व्यवसायाचा धंदा उधळला

महा पोलीस न्यूज । दि.२० जून २०२५ । यावल तालुक्यातील किनगाव शिवारात चोपडा-यावल महामार्गालगत असलेल्या ‘मनमंदिर’ परमिट रूम व लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अवैध वेश्याव्यवसायाचा गोरखधंदा यावल पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलीस निरीक्षक आर.टी.धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.१९ जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली आहे. यावल पोलीस ठाण्यात याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून १ पीडित महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार यावल-चोपडा रस्त्यावर किनगाव शिवारात मनमंदिर बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समजले होते. पोलीस निरीक्षक यांनी त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी सापळा रचला. बनावट ग्राहक आणि पंच पाठवून त्यांनी अगोदर याबाबत खात्री केली.

मिस कॉल आला आणि डाव उधळला
गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पोहचला. वेश्या व्यवसायाची खात्री झाल्यावर ठरलेल्या नोटा त्याने काउंटरवर दिल्या. हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर खोलीत हा धंदा सुरु होता. बनावट ग्राहकाने निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मोबाईलवर मिस कॉल देताच ते पथकासह त्याठिकाणी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत हवालदार वासुदेव मराठे, अमित तडवी, सागर कोळी, एजाज गवळी, भारत कोळी, मिनाक्षी तडवी, अल्लाउद्दीन तडवी हे देखील होते. हॉटेलमधील तिघांना ताब्यात घेत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली.

तिघांविरुद्ध गुन्हा, साहित्य हस्तगत
पोलिसांनी या कारवाई दरम्यान घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (वय २८, रा. दहिगाव), पराग प्रकाश लोहार (वय २४, रा.खेडी खुर्द, जळगाव), समाधान शालिक तायडे (वय २२, रा.साकळी) या तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button