
यवतमाळ येथे ऑपेशन प्रस्थानचा विशेष उपक्रम; सामाजिक सलोख्यामुन गाव ते जिल्हा क्रिडा महोत्सवाचे आयोजन
यवतमाळ प्रतिनिधी
ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता संबंध अधिक वृध्दीगंत करण्याकरीता पोलीस समन्वय (Community Policing) ही योजना संकल्पना राबविण्याचे दृष्टीने गाव ते जिल्हा पातळीवरील युवक व युवतींचा यवतमाळ क्रिडा महोत्सव आयोजन जिल्हयामध्ये दि. ०५/०१/२०२५ ते २२/०१/२०२५ पर्यंत करण्यात आले होते. पो.स्टे. स्तरावर दि. ०५/०१/२०२५ ते १५/०१/२०२५ पर्यंत कबड्डी क्रिडा प्रकारात २४९ संघ, व्हॉलीबॉल प्रकारात १४६ संघ, तसेच क्रिकेट प्रकारात १६५ संघ असे एकूण ५६० संघातील ६७१७खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता.
त्यानंतर दुस-या टप्यामध्ये दि. १५/०१/२०२५ ते १९/०१/२०२५ पर्यंत पो.स्टे. स्तरावरील विजयी झालेल्या संघाचे उपविभागीय स्तरावर सामने घेण्यात आले. त्यामध्येएकूण ०६ उपविभागामध्ये कबड्डी प्रकारात २९ संघ, व्हॉलीबॉल प्रकारात २९ संघ, तसेच क्रिकेट प्रकारात २० संघ असे एकूण ८८ संघ सहभागी झाले होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांचे संकल्पनेतून गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यापेक्षा गुन्हेगार घडणारच नाहीत, यासाठी जिल्हयातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाउल रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाममार्गाला लागलेले शाळा कॉलेज सोडलेले होतकरु तरुणांना प्रथमच “ऑपरेशन प्रस्थान” माध्यमातून एकत्र करुन प्रथम कौशल्य प्रशिक्षण क्रेन्द्र. राळेगांव येथे प्रशिक्षण देवून उमेदवारांना नामांकीत हॉटेल व कंपनी मध्ये रोजगाराची संधी मिळालेली आहे. सर्व सामान्य नागरीक व पोलीसांमध्ये मैत्रीपूर्ण सबंध निर्माण होण्याकरीता तसेच ग्रामीण शहरी भागातील तरुण वर्ग एकत्र करणे व बेरोजगारीमुळे तसेच व्यसनाधिनते मुळे वाममार्गाला लागलेले तरुण गुन्हेगारीकडे वळू नये सामाजीक स्वास्थ तथा विकासाकरीता पोषक वातावरण निर्माण व्हावे म्हणून युवाशक्तीचा योग्य उपयोग होणे करीता ऑपरेशन प्रस्थानची सुरुवात करण्यात आलेली आहे.
यवतमाळ क्रिडा महोत्सव बक्षिस वितरण समारंभाचे वेळी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थानची संकल्पना, पार्श्वभूमी, उद्देश व दिशा स्पष्ट करतांना सांगीतले की. सुरक्षीत व विकासीत समाजाकरिता समाजातील भरकटलेला व गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुणांना वाममार्ग व गुन्हेगारीपासुन मुक्त करुन त्यांचे व्यक्तीमत्त्वात्चा संर्वागीण विकास साधने आवश्यक आहे. त्याअनुषंगाने यवतमाळ पोलीस दलाने ऑपरेशन प्रस्थानचे माध्यमातुन व्यासपिठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामाध्यमातुन सामाजीक सलोखा व भरकटलेला व गुन्हेगारीकडे वळलेल्या तरुणांकरिता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून यवतमाळ क्रिडा महात्सव घेवुन गाव ते जिल्हा पातळीवरील युवकांना पोलीसांसोबत एकत्र आणण्यात आले. याकरिता जिल्हातील सर्व नागरीकांनी पोलीसांवर विश्वास दाखवुन मोठा प्रतिसाद दिला आहे.
क्रिडा महोत्सवाचा पोलीस व सामान्य नागरीकांमधील अंतर कमी व संबध अधिक दृढ होणे करीता नक्कीच लाभ होणार आहे. क्रिडामहोत्सवामध्ये एकूण ६७१७ युवकांनी सहभाग नोंदविला आहे. सर्व युवकांची यवतमाळ पोलीस दलास ग्राम सुरक्षा दल व पोलीस मित्र म्हणून मदत होणार आहे. ज्यामुळ पोलीस व जनते मधील परस्पर सहकार्य आणि संवाद वाढविण्यास भरीव मदत होणार आहे.
यवतमाळ क्रिडा महोत्सव बक्षिस समारंभास जिल्हाधिकारी यांनी संबोधीत करतांना म्हटले की, “यवतमाळ पोलीस दलाने सामाजीक सलोखा हा गाव पातळी ते जिल्हयापर्यंतच्या युवकांना सोबत घेवुन राबविला. युवकांना त्यांचे कौशल्य दाखविण्याकरिता महत्वाचे व्यासपिठ उपलब्ध करुन दिले हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
तसेच. आ. किसनराव वानखडे यांनी म्हटले कि, मानवावर ज्याप्रमाणे संस्कार केले जाईल त्याप्रमाणे माणुस घडल्या जाईल. याकरिता यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडुन राबविण्यात येत असलेले आपॅरेशन प्रस्थान मोठी जबाबदारीची भुमीका पाडत आहे.सदर स्पर्धेमध्ये (१) कबड्डी या खेळ प्रकारात विजयी संघ आजाद हिंद क्रिडा मंडळ. पहुर उपविभाग यवतमाळ तर उपविजेते पद साई व्यायाम प्रसारक मंडळ, नेर उपविभाग दारव्हा या संघास मिळाले आहे. (२) व्हॉलीबॉल या खेळामध्ये विजयी संघ न्यू स्टार संघ. उमरखेड उपविभाग उमरखेड तर उपविजेते पद शिवाजी क्रिडा मंडळ, यवतमाळ उपविभाग यवतमाळ संघाने पटकावले आहे. तसेच (३) क्रिकेट मध्ये अमरदिप क्रिकेट संघ, वणी विजयी झाले तर उपविजयी संघ JCB क्रिकेट ग्रामीण संघ यवतमाळ उपविभाग हे झाले आहे. तसेच महिला कबड्डी मध्ये महिला मित्र क्रिडा पांढरकवडा तर उपविजेता संघ टिएसओ वणी संघ झाले आहे.