कुटुंब वरच्या मजल्यावर झोपायला गेल्याने चोरटयांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल लांबविला

कुटुंब वरच्या मजल्यावर झोपायला गेल्याने चोरटयांनी साडेपाच लाखांचा मुद्देमाल लांबविला
चाळीसगाव प्रतिनिधी
घरातील व्यक्ती हे वरच्या मजल्यावर झोपायला गेल्याने अज्ञात चोरटयांनी घरचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना रविवारी पाहते उघडकीस आली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , वाघळी गावातील शेतकरी व दुग्ध व्यवसाय करणारे भागवत खैरे आपल्यावास्तव्याला असून ते शनिवारी रात्री दुसर्या ठिकाणी झोपायला गेले तर त्यांचा मोठा मुलगा हा शेतात निघून गेला आणि लहान मुलगा हा परिवारासह वरच्या मजल्यावर झोपण्यासाठी गेल्याने हि संधी साधत चोरट्यांनी ८ रोजी रात्री १० ते ९ रोजीच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास घराचे कुलूप तोडूनआत प्रवेश करून अडीच लाख रुपयांची रोकड ४० ग्रॅम वजनाच्या व एक लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ५२ हजार ५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, २० ग्रॅम वजनाची व ७० हजार रुपये किमतीची मंगलपोत मिळून एकूण ५ लाख ४७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लांबवला. याबाबत खैरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे