Detection

पत्नीची दारूच्या नशेत हत्या करून फरार झालेल्या पतीला पुण्यातून ठोकल्या बेड्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

वरणगाव : -एका 25 वर्षीय विवाहितेची हत्या करून फरार झालेल्या तरुणाला स्थानिक शाखेच्या पथकाने पुण्यातून बेड्या ठोकल्या असून त्याला जळगावत आणण्यात आले आहे.

कौटुंबिक वादातून सना अजीज शेख (वय २५, रा. बीड, जि.परळी, वैजनाथ) या विवाहितेची हत्या करीत तिचा पती अजीज शेख याने पळ काढला होता. ही घटना वरणगावजवळील वेल्हाळे शिवारातील वीटभट्टीवर रविवारी मध्यरात्री घडली होती. अजीज सलीम शेख (वय ३५) याला पुण्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,किशोर डिगंबर पाटील यांचे वेल्हाळे शिवारातील शेत गट क्रमांक ६५१ मध्ये शेत असून या शेतात अली हुसेन इसाक कुरेशी हे वीटभट्टी चालवतात. या वीटभट्टीवर कामासाठी परळी जिल्ह्यातील काही जण आले यामध्येअझहर नियोजोद्दीन शेख (वय २४, जुने स्टेशन परळी वैजनाथ, जि. बीड, ह. मु. वेल्हाळा शिवार) ह देखील आपली मोठी बहिण सना व मेहुणा अजीज शेख तसेच आई, वडिल, भाऊ, वहिनी आदींसह वीटभट्टीवर कामाला आहेत. सना हिचा पती अजीज शेख याला दारूचे व्यसन असल्याने तो सना शेख हिला दारूच्या नशेत मारहाण करण्याचा प्रकार करत होता.

दररोजचा प्रकार असल्याने यास सर्व कंटाळले होते. शनिवारी अझहर शेख, शर्पू, कृष्णा, ज्वाला, अजीज शेख यांनी वरणगाव येथे बाजारासाठी येत बाजारहाठ केला व यावेळी पुन्हा अजीज शेख याने मद्य प्राशन करून रात्री सव्वाआठ वाजता घरी आला. मध्यरात्रीच्या सुमारास अजीज शेख याने पत्री सनासोबत वाद घालून दारूच्या नशेत तिचा गळा आवळला.

रविवारी सकाळ होवूनही कुटुंब बाहेर न आल्याने अझहर शेख यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर सना यानिपचीत झोपल्या असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी दार तोडून खोलीत प्रवेश केला असता सना हिला कुटूंबाने त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत मध्यरात्रीच खुनानंतर पसार झाल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता.

खुनानंतर पसार झालेल्या संशयित अजीज सलीम शेख (वय ३५) याच्या पुण्यात जळगाव गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी बेड्या ठोकल्या.

या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पो.उप.नि.शरद बागल, हवालदार प्रितम पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रविंद्र कापडणे, रविंद्र चौधरी, महेश सोमवंशी यांनी केली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button