
युवासेना शिवसेना तर्फे मोफत सीईटी सराव परीक्षा
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी 29 मार्चला आयोजन
जळगाव : – अकरावी, बारावी व पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी युवासेना – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोफत सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग सहाव्या वर्षी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा घेतली जात आहे.
परीक्षेचे स्वरूप व केंद्रे
ही सराव परीक्षा अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी व फार्मसी शाखांच्या कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (CET) साठी उपयुक्त ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार, 29 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत परीक्षा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड आणि महावीर क्लासेस, गणेश कॉलनी, जळगाव येथे होणार आहे.
नोंदणी व संपर्क
या परीक्षेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.yuvasenacet.com या संकेतस्थळावर 25 मार्च 2025 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
विराज कावडीया (उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव, युवासेना) – 9422222699 प्रितम शिंदे (युवासेना कॉलेज कक्ष युवाधिकारी) – 9405446632 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.