Other

‘युवा SPARK-२०२५’ या विद्यापीठस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे अनावरण

जळगाव (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना नवी दिशा व पंख देण्यासाठी कावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील केसीआयआयएल (KCIIL) इन्क्युबेशन सेंटर तर्फे युवारंग २०२५ अंतर्गत प्रथमच आयोजित होणाऱ्या ‘युवा SPARK-२०२५’ या विद्यापीठस्तरीय इनोव्हेशन स्पर्धेच्या माहितीपत्रकाचे अनावरण कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी यांच्या हस्ते आज २४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.

या प्रसंगी KCIIL संचालक मंडळ सदस्य डॉ. राजेश जावळेकर, डॉ. आशुतोष पाटील, डॉ. अरुण इंगळे, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील तसेच केसीआयआयएल कार्यक्रम समन्वयक रोशनी जैन उपस्थित होत्या.

युवा SPARK-२०२५ ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांचे नवोन्मेषी विचार प्रत्यक्षात आणण्याची संधी देणार असून शेती, ग्रामीण विकास, नवतंत्रज्ञान आणि ओपन इनोव्हेशन या क्षेत्रांतून विद्यार्थ्यांना त्यांच्या नवकल्पना सादर करण्यासाठी एक अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन त्यांना स्टार्टअप व उद्योजकतेकडे वाटचाल करण्यास प्रेरित करणार आहे.

या स्पर्धेची रूपरेषा : १) कल्पना नोंदणी: २० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२५, २) ज्युरी द्वारे मूल्यांकन, ३) सर्वोत्कृष्ट १० कल्पनांचे युवारंग २०२५ मध्ये सादरीकरण, ४) ३ सर्वोत्कृष्ट कल्पनांना युवारंग २०२५ मध्ये बक्षीस वितरण. तसेच सर्वोत्कृष्ट १० कल्पनांना KCIIL मार्फत एक वर्ष मोफत इनक्युबेशन सहाय्य दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, आपले कल्पक व नाविन्यपूर्ण विचार मांडावेत आणि विद्यापीठाच्या स्टार्टअप व इनोव्हेशन इकोसिस्टमला अधिक बळकट करावे. ही स्पर्धा केवळ पुरस्कार जिंकण्याची संधी नाही तर आपल्या कल्पनांना वास्तवात आणून स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्याची सुवर्णसंधी आहे.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी : https://kciil-kbcnmu.in यावर संपर्क साधावा असे आवाहन केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button