झुरखेडा येथील कथा स्थळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी
जळगाव प्रतिनिधी I :- शहरानजीक पाळधी जवळील झुरखेडा पथराड मार्गावर दिनांक 25 ते 30 डिसेंबर दरम्यान बागेश्वर बाबा यांच्या श्री हनुमंत कथा व दिव्य दरबाराचे भव्य आयोजन भव्य स्वरूपात होत आहे.
या कथेच्या स्थळी आज दिनांक 24 रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट देऊन या भव्य आयोजनाची नियोजनाची माहिती घेत तयारीचा आढावा घेतला.मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती देणार असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच प्रशासनाला व आयोजन समितीला उत्तम व यशस्वी नियोजन होण्यासाठी विशेष सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांचे समवेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी ,त्रिमूर्ती फार्मसी कॉलेजचे संचालक व आयोजन समिती सदस्य मनोज पाटील सर,सुनील पाटील,संदीप पाटील,अनिल पाटील, यांचेसह इतर सदस्यांची ,समिती प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
झुरखेडा कथा स्थळी नियोजन पूर्णत्वाला..व्यासपीठ,यज्ञ मंडप झाले सज्ज
झुरखेडा निमखेडा ते पथराड मार्गालगत शंभर एकर जागेतील परिसरात पंडित धीरेंद्र शास्त्रीजी बागेश्वर बाबांच्या श्री हनुमंत कथा व दिव्य दरबार या आयोजनासाठी अत्यंत काटेकोर नियोजन तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीने विशेष परिश्रम घेत केले आहे. या परिसरात भाविकांना बसून कथा ऐकण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण उत्तम रित्या करण्यात आले आहे.कथा स्थळी पोहचण्या आधीच काही अंतरावर विशाल पार्किंग व्यवस्था उभारली गेली आहे.माता भगिनी,जेष्ठ नागरिकांना आवश्यक त्या सुविधा जवळच निर्माण करण्यात आल्या आहेत.बाहेर गावाहून आलेल्या भाविकांना स्नानगृह ,शौचालये याची व्यवस्था येथे जवळच करण्यात आली आहे.पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
केमिस्ट संघटनेच्या वतीने मोफत औषध वितरण सेवा… सेवा कार्याबाबत जलसंपदा मंत्र्यांना पदाधिकारी यांनी दिली माहिती.
जळगांव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने केमिस्ट भूषण सुनील भंगाळे यांच्या प्रेरणेतून जळगाव तालुका व धरणगाव तालुका केमिस्ट या स्थळी भव्य आयोजनात आलेल्या भाविकांना आरोग्य रक्षण हेतूने मोफत औषधीचे वितरण या ठिकाणी दि.२५ ते ३० दरम्यान करणार आहेत.त्या दृष्टीने आज स्टॉल उभारणी करण्यात आली असून तेथे जिल्ह्यातील केमिस्ट सेवा देण्यासाठी सहभागी होणार आहेत.तालुका केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी साहेबराव भोई यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कथा स्थळी भेटी दरम्यान जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या मोफत औषधी वितरण सेवेची माहिती दिली.