Other

ब्रेकिंग : जळगाव एलसीबीत ‘या’ कर्मचाऱ्यांची लागली वर्णी!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनातील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू आहे. सर्वसाधारण बदल्यांमध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी रात्री उशिरा आदेश काढले आहेत.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत नेमणूक होण्यासाठी दरवर्षी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी चुरस असते. बरेच कर्मचारी वशिल्याने आपला जुगाड लावून घेतात. तीन वर्षापूर्वी कोविड काळानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी एलसीबीमध्ये नियुक्तीसाठी काही निकष ठरवले होते. गेल्या ३ वर्षापासून एलसीबीच्या सर्वसाधारण बदल्या झाल्या नव्हत्या. नुकतेच झालेल्या बदल्यांमध्ये एलसीबीच्या देखील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

www.mahapolicenews.com

पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी काढलेल्या आदेशानुसार रविंद्र अभिमन पाटील – धरणगाव, प्रदिप सपकाळे – रावेर, मुरलीधर चुडामन धनगर – पो.मु. जळगाव, निलेश विश्वासराव सोनवणे – चोपडा शहर, किशोर राजाराम पाटील – एमआयडीसी, संदीप चव्हाण – उपविपोअ. कार्या भुसावळ, गोपाळ गवारे – भुसावळ बाजारपेठ, शातांराम पवार – चाळीसगाव ग्रामीण, भुषण शेलार – चाळीसगाव शहर, राहुल कोळी – एरंडोल, विलास गायकवाड – उपविपोअ. कार्या, अमळनेर, जितेंद्र पाटील – पिपंळगाव हरे, संजय वाल्मीक सुर्यवंशी – धरणगाव, रविंद्र चौधरी – मुक्ताईनगर, हिरालाल पाटील – भुसावळ तालुका, अतुल रघुनाथ वंजारी – एमआयडीसी, सुनिल सैंदाणे – सावदा, विनोद संभाजी पाटील – पो.मु. जळगाव, दिपक माळी – धरणगाव, रविंद्र कापडणे – जिवीशा, सचिन पोळ – भुसावळ बाजारपेठ, प्रविण पुडंलिक भालेराव – पो.मु. जळगाव, प्रदीप चवरे – पो.मु. जळगाव, विष्णु अर्जुन बिऱ्हाडे – पो.मु. जळगाव, यशवंत टहाकळे – सावदा, मनोज सुरवाडे – पो.मु. जळगाव, गजानन देशमुख – नशिराबाद, विजय दमोदर पाटील – शनिपेठ यांची एलसीबीत वर्णी लागली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button