Crime

जळगाव जिल्हा पोलिस दलात लवकरच १६ अत्याधुनिक वाहने होणार दाखल ; २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर

जळगाव जिल्हा पोलिस दलात लवकरच १६ अत्याधुनिक वाहने होणार दाखल ; २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर

जळगाव प्रतिनिधी l जळगाव जिल्हा पोलिस वाहनताफ्यात लवकरच १६ अत्याधुनिक गाड्यांचा समावेश होणार आहे. यात १५ महिंद्रा स्कॉर्पिओ आणि १ महिंद्रा बोलेरो ७०० या वाहनांचा समावेश आहे. यासाठी राज्य शासनाने २ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या नव्या गाड्यांमुळे पोलिस दलाचे कामकाज अधिक कार्यक्षम, गतिमान आणि आधुनिक होईल. गुन्हेगारी नियंत्रण, गस्त वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या गाड्या महत्त्वपूर्ण ठरतील. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने ही मागणी शासनाकडे सादर करण्यात आली होती.

मान्यतेनंतर या गाड्या लवकरच पोलिस दलात दाखल होतील.या वाहनांमध्ये जीपीएस, वायरलेस सेटअपसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही गाड्या मोलाची भूमिका बजावतील, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button