कांताबाई पहाडे यांच्या परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प

कांताबाई पहाडे यांच्या परिवाराचा देहदानाचा प्रेरणादायी संकल्प
लायन्स क्लब उपक्रमातून अमळनेरला मिळाली मानवतेची नवी प्रेरणा
अमळनेर :(पंकज शेटे) “जग सोडून गेल्यानंतरही आपलं शरीर समाजासाठी उपयोगी पडू शकतं, हीच खरी मानवी सेवा आहे…” या भावनेला प्रत्यक्ष रूप देत पहाडे परिवाराने एक ऐतिहासिक व समाजप्रबोधन करणारा निर्णय घेतला आहे.
जागतिक अवयवदान दिनानिमित्त (१३ ऑगस्ट) लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे वर्षभर अवयवदान जनजागृती मोहीम राबवली जाते. याचाच भाग म्हणून लायन्स सदस्य महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री श्रीमती कांताबाई रतनलालजी पहाडे व यांच्या परीवाराने देहदानाचा समाजाभिमुख निर्णय जाहीर केला.
या प्रसंगी बोलताना महावीर पहाडे यांनी भावनिक शब्दांत सांगितले की –
“अवयव स्वर्गात नेऊ नका, त्यांची खरी गरज इथेच आहे. कोणाचं जीवन वाचवणं हाच सर्वांत मोठा धर्म आहे. आईचं जीवन सेवा व त्यागाने परिपूर्ण होतं, त्याच पवित्र विचारांना पुढे नेत आम्ही हा निर्णय घेतला.”
ही मोहीम केवळ माहिती देण्यापुरती मर्यादित न राहता, अनेकांच्या अंतःकरणाला स्पर्शून गेली. अनेकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा करू






