जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला 88 विभागांचा आढावा; प्रलंबित सुरू असलेल्या कामांचा युद्ध पातळीवर पाठपुरावा सुरू
समन्वयासाठी डेस्क, कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही याची घेणार काळजी
जळगाव;- जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुखांना शासनाच्या विविध योजना, प्रकल्प यांचा आढावा घेण्यासाठी विभाग/कार्यालय निहाय गुगल स्प्रेडशीट तयार करणेत आलेले असून सर्व 88 विभाग प्रमुखांच्या अखत्यारितील विभागांचा आढावा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी विभाग/ कार्यालयनिहाय घेतला. संबंधित विभाग प्रमुख/ कार्यालय प्रमुख यांचा प्रत्येकी अर्धा तास आढावा घेण्यात आला. ज्यात मंत्रालय स्तरापासून ते विभाग स्तरावर प्रलंबित असलेल्या कामाचा, सुरु असलेल्या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील विविध विकासकामांची गती वाढून गुणवत्तापूर्ण कामकाज होईल, याची या माध्यमातून दक्षता घेतली जाईल.
गुगल स्प्रेडशीट भरण्यामुळे वाढतोय समन्वय
जिल्ह्यातील सर्व 88 विभागांना त्यांच्या संबंधित असलेल्या विषयाची स्प्रेडशीट मुद्दे व विषयनिहाय देण्यात आलेली आहे. ती स्प्रेडशीट संबंधित विभागाकडून भरल्यामुळे एकमेकांच्या संबंधित कामं कुठे आडले आहेत हे कळले. त्यामुळे संबंधित विभागाला समन्वय करणे सोपे झाले आहे. आता ही नियमित प्रकिया असणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी आढावा घेताना, कोणते काम पेंडिंग आहे, नेमकं कुठे आहे जाणून घेवून संबंधित यंत्रणेला दूरध्वनीवर संपर्क करून कोणते काम प्रलंबित आहे ते सविस्तर सांगून काम पूर्ण करण्यासाठी लागणारा पाठपुराव्यासाठी एक डेस्क तयार केला आहे. तो पुढचा पाठपुरावा करेल अशी यंत्रणा निर्माण केल्यामुळे कामाला गती आली आहे. यापुढे कोणते काम खोळंबले आहे ते या गुगल स्प्रेडशीट मुळे कळणार असून त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहणार आहे. एखादी वेळी विभागाकडून माहिती भरण्यास विलंब झाल्यास संबंधित डेस्क त्यावर विचारणा करून ती माहिती भरायला लावेल.
जिल्हा नियोजनच्या अंतर्गत सुरु असलेल्या प्रकल्पांना गती
जिल्ह्यात जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून जे प्रकल्प सुरु आहेत. त्या प्रत्येक प्रकल्पाला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालील टीमने प्रत्यक्ष फिल्डवर भेटी देऊन नेमक काम कसं सुरु आहे. कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिला. त्याचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतल्यामुळे प्रकल्प गती वाढली आहे.