महापुरुषांची जयंती ‘वाचून’ साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

महापुरुषांची जयंती ‘वाचून’ साजरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
चिंचखेडा बु. येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी उपक्रम
मुक्ताईनगर | प्रतिनिधी
आजच्या काळात महापुरुषांच्या जयंती नाच-गाण्याने साजऱ्या होतात, अशा पार्श्वभूमीवर चिंचखेडा बु. येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती वाचन, लेखन व वक्तृत्वाच्या माध्यमातून साजरी करत एक वेगळा आदर्श घालून दिला. या स्तुत्य उपक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, मेडल, ट्रॉफी व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
वकृत्व स्पर्धा – स्वाती मधुकर गावंडे (प्रथम), उत्कर्षा पांडुरंग दिवाने (द्वितीय), लक्ष्मी शेषराव इंगळे (तृतीय)
निबंध स्पर्धा – सायली शरद गावंडे (प्रथम) स्वाती मधुकर गावंडे (द्वितीय) विराज वाल्मीक गावंडे (तृतीय)
रंगभरण स्पर्धा – सायली शरद गावंडे (प्रथम) नंदनी सुनील लिंगे (द्वितीय) पुष्कर विकास पाटील (तृतीय)
उत्तेजनार्थ बक्षीस – भाविका पाटील, अंजुमबी फकीर, रीता कोळी, राधिका धायडे, स्वराज गायगोळ, सोहम गावंडे, दर्पण बावस्कर, काजल तायडे, आदित्य कोळी, अथर्व तायडे, मयुरी पिळोदकर, देविका तायडे, वैष्णवी कोळी, रक्षा खोंदले, प्रतीका धायडे, तेजल कचरे, तनुजा नमायते, सारिका पिळोदकर, वेदिका पाटील, तेजस्विनी खोंदले, अर्णव कांडेलकर, रितेश बावस्कर, मोहित नमायते, श्रुती पिळोदकर, प्राची देशमुख, गायत्री पाटील, रितिका कांडेलकर, सुवर्णा मोरे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पत्रकार रविंद्र हिरोळे यांनी उपस्थित स्पर्धकांना महापुरुषांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नव्हे तर वाचूनच साजरी केली जाऊ शकते असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून पंकज हिरोळे, दीपक हिरोळे, प्रशांत हिरोळे, विनोद थाटे, शिवाजी वानखेडे, गौतम वाघ, राजू सोनवणे, वायला पोलीस पाटील सुनील तायडे, राहुल इंगळे उपस्थित होते. केंद्र प्रमुख गणेश कोळी, मुख्याध्यापक देवानंद नमायते, समाधान निकम, महादेव कोळी, विष्णू कोळी, पद्माकर तायडे, उपसरपंच अर्जुन इंगळे, अशोक निकम, जितेंद्र तायडे, गोलू कांडेलकर, राजू कोळी, राजू तायडे, कडू पिळोदकर, अजय गायकवाड, भूषण निकम, कैलास इंगळे, दादाराव निकम, चंद्रभान निकम, विलास सावळे, किशोर इंगळे व सम्राट अशोक सामाजिक संघ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अशोक निकम यांनी केले.