
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने, महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) च्या कलम २२न नुसार प्रशासकीय कारणास्तव, रा.पो.से. (राज्य पोलीस सेवा) अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनांबाबत आदेश जारी केला आहे. शासनाच्या आदेशानुसार जळगावात दोन नवीन अधिकारी तर पदोन्नतीने १ असे तीन अधिकारी जिल्ह्यात येणार आहेत.
राज्य शासनाने पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)” या संवर्गातील ३५ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले आहेत. त्यात जळगाव शहर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून मालेगाव येथील नितीन गणापुरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आलेले बापू रोहोम यांची सुधारित पाचोरा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस उप अधीक्षक/सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील पदावरपदोन्नती देण्याकरता तयार करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक (नि:शस्त्र)” या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या नियमीत निवडसूची २०२४-२५ यामध्ये समाविष्ट असलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस उप अधीक्षक/ सहा. पोलीस आयुक्त (नि:शस्त्र)” या संवर्गातील पदावर सेवाजेष्ठतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात अनिल डिगंबर बडगुजर यांची फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.






