Other

विद्यार्थ्यांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील   – प्रा.एस. टी.इंगळे.

विद्यार्थ्यांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील   – प्रा.एस. टी.इंगळे.

जळगाव प्रतिनिधी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतांना कौशल्याची जोड मिळाल्यास ते जीवनात यशस्वी होतील. त्यातून त्यांचा व पर्यायाने राष्ट्राचा विकास होईल”.असे प्रतिपादन कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. एस.टी.इंगळे यांनी केले. सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथे पी.एम.उषा सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत आयोजित विद्यार्थ्यांकरीता कौशल्य विकास कार्यक्रम यावरील एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. शिक्षणानंतर रोजगार प्राप्त होण्याची शक्यता असल्यास, विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील व रोजगार निर्माण करणारे शिक्षण देणे हेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अर्थात NEP चे मुख्य उद्दिष्ट आहे ,असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विविध विषयांच्या सीमारेषांमध्ये विद्यार्थ्यांना अडकवून न ठेवता वेगवेगळे विविध विषय निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून देण्यात आलेले आहे.कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे, पी.एम. उषा सॉफ्ट कंपोनंट अंतर्गत सुमारे 140 विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रातील ग्रामीण आदिवासी आणि शहरी भागांमध्ये छोट्या मोठ्या महाविद्यालयातून हे उपक्रम राबविण्यात आले त्यातून खऱ्या अर्थाने गरजू आणि अपेक्षित विद्यार्थ्यांपर्यंत या योजनांचा लाभ विद्यापीठ पोहोचवू शकले असेही प्रा. एस.टी. इंगळे यांनी प्रतिपादन केले.याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत जगन्नाथ चौधरी हे होते.श्री चंद्रकांत चौधरी यांनी असे प्रतिपादन केले की, जीवनात व्यवसाय आणि रोजगारासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेबरोबर इतर अन्य अनुषंगिक अतिरिक्त पात्रता सुद्धा युवकांनी आत्मसात कराव्या. आजच्या स्पर्धेच्या युगात अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला नेहमी प्राधान्य दिले जात असतं म्हणून आपल्यामध्ये जास्तीचे गुण आणि कौशल्य असणे गरजेचे आहे. या कौशल्य विकास कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये असे विविध कौशल्य निश्चितपणे निर्माण होतील आणि विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. लीलाधर विश्वनाथ चौधरी,सचिव श्री. नितीन वासुदेव चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे, उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी कार्यशाळेचे समन्वयक डॉ.सुनील नेवे,तसेच विशेष वक्ता म्हणून नाशिक एज्युकेशन अकॅडमी चे प्रा. सुरेश पांडे हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. किशोर कोल्हे यांनी केले.कार्यशाळा आयोजना पाठीमागचा हेतू त्यांनी सांगितला.उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.मुकेश चौधरी व आभार प्रदर्शन डॉ.मीनाक्षी वाघुळदे यांनी केले. या कार्यशाळेमध्ये परिसरातील यावल महाविद्यालय, रावेर महाविद्यालय,ऐनपूर महाविद्यालय,फैजपूर महाविद्यालय ,जामनेर महाविद्यालय,भुसावळ महाविद्यालय,इत्यादी महाविद्यालयातून विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये एकूण चार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले होते. आंतर वैयक्तिक कौशल्य (प्रा.सुरेश पांडे जळगाव),वेळेचे व्यवस्थापन (प्रा.सुरेश पांडे जळगाव) नेतृत्व विकास कौशल्य (प्रा.रवींद्र कीनगे मुक्ताईनगर),प्रभावी संवाद कौशल्य (प्रा.एस. ए.पाटील,ऐनपूर)यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले.समारोप कार्यक्रम प्रसंगी प्रा. एस. ए. पाटील, प्रा. सुरेश पांडे, प्राचार्य प्रा.किशोर कोल्हे यांच्या शुभहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले . त्यामध्ये कु.तेजस्विनी सपकाळे (महिला महाविद्यालय भुसावळ) श्री.वैभव प्रमोद चौधरी (फैजपूर महाविद्यालय) कु.धनश्री अशोक कोळी(महिला महाविद्यालय भुसावळ) श्री.हितेश महेंद्र महाजन (यावल महाविद्यालय) कु.साक्षी प्रशांत चौधरी (भालोद महाविद्यालय)श्री. दीपांशू दिनेश इंगळे (भालोद महाविद्यालय)हे विद्यार्थी सहभागी होते. तसेच यावेळी कु.धनश्री अशोक कोळी ( महिला महाविद्यालय भुसावळ), कु.दीक्षा राजू पंडित (यावल महाविद्यालय) ,श्री.मुकेश भालेराव (भालोद महाविद्यालय)या विद्यार्थ्यांनी कार्यशाळे संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी विविध महाविद्यालयातून आलेले प्रा.भावना शंकोपाळ (महिला महाविद्यालय भुसावळ), प्रा. माधुरी भुतडा (महिला महाविद्यालय भुसावळ),प्रा. विकास वाघुळदे (डी.एन.कॉलेज फैजपूर ),प्रा. अचल भोगे (डी.एन.कॉलेज फैजपूर) प्रा. हेमंत पाटील (यावल महाविद्यालय)प्रा.छत्रसिंग वसावे (यावल महाविद्यालय),प्रा. संजय इंगळे(जामनेर महाविद्यालय),प्रा.आर.डी.वाघ (जामनेर महाविद्यालय),प्रा.विनय पाटील (जामनेर महाविद्यालय)यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.एकूण 150 विद्यार्थी व विद्यार्थिनी कार्यशाळेला उपस्थित होते.प्रा. सुरेश पांडे यांच्या सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.जतीनकुमार मेढे यांनी केले तर समारोप समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.मीनाक्षी वाघुळदे व आभार प्रदर्शन प्रा.राकेश चौधरी यांनी केले.याप्रसंगी आयोजन समितीचे समन्वयक डॉ. सुनील नेवे,डॉ.जतीन मेढे,प्रा.मुकेश चौधरी,प्रा. राकेश चौधरी,डॉ. मीनाक्षी वाघुळदे ,डॉ.पद्माकर सावळे, डॉ. व्ही पी पवार, प्रा. हेमंत इंगळे ,डॉ.किरण चौधरी, प्रा.चंद्रकांत वानखेडे,प्रा. मोहिनी तायडे, डॉ.गणेश चौधरी, डॉ. दिनेश पाटील, प्रा.काशिनाथ पाटील, डॉ. दिनेश महाजन, डॉ. मुकेश पवार,डॉ. दिगंबर खोब्रागडे , प्रा.गीतांजली चौधरी,प्रा. फाल्गुनी राणे,प्रा.कोमल सावळे, प्रा.भावना प्रजापती,प्रा.जान्हवी परतणे,प्रा.हेमलता कोल्हे, प्रा.शैलजा इंगळे,श्रीमती. मोहिनी चौधरी, श्री. बाळकृष्ण चौधरी, श्री. किशोर चौधरी, श्री. पंकज नेहेते ,श्री. तुळशीराम पाटील, श्री.कल्याण चौधरी,श्री.दिलीप इंगळे, इत्यादी सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छायाचित्रसहित प्रसिद्ध करावी ही विनंती
प्रा.डॉ. सुनील नेवे

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button