श्री स्वामी नारायण गुरुकुलमधील स्वामी ऋषीस्वरुपदास यांची आत्महत्या ; साकेगाव येथील घटना

भुसावळ : साकेगाव येथील श्रीस्वामी नारायण गुरूकुलमधील स्वामी नारायण गुरूकुलचे सचिव स्वामी ऋषीस्वरूपादास महाराज (वय २८) यांनी गुरूकुलमधील त्यांच्या राहत्या खोलीत छताला दोर बांधून गळफास घेतल्याची घटना शनिवारी पहाटे ६ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
जळगाव रोडवरील श्री स्वामी नारायण गुरूकुल येथे राहत असलेले स्वामी ऋषीस्वरूपादास हे शनिवारी गुजराथमधील वडताल येथे मोठ्या स्वामींसोबत जाणार होते. स्वामी ऋषीस्वरूपादास यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत शाळेच्या आवारात गस्त घातली तसेच सर्वत्र लक्ष ठेवले. दरम्यान, शनिवारी सकाळी गुजराती
जाण्यासाठी वाहने तयार झाल्यानंतर जळगाव येथे सुरू असलेल्या स्वामी नारायण महोत्सवासाठी आलेले स्वामी के. के. शास्त्री महाराज व अन्य महाराज हे देखील तेथे आले होते, ते सर्व गुजरात जाणार होते मात्र सकाळी ऋषी स्वरूपादास हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.