
मजहर पठाण यांची सलग चौथ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड
जळगाव : अल्पसंख्यांक संघटन मजबूत करण्यावर पक्षाचा भर, कार्यकर्त्यांत उत्साह
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अल्पसंख्यांक संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी मजहर पठाण यांची सलग चौथ्यांदा फेरनिवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती बुधवार, दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांनी जाहीर करत अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
या वेळी जिल्ह्याचे नेते व प्रदेश सरचिटणीस रवींद्र भैय्या पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष सय्यद अन्सार, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महानगर कार्याध्यक्ष संग्राम जगताप, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, युवक महानगराध्यक्ष रिकु चौधरी, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष डॉ. रिजवान खाटीक, माजी नगरसेवक सुनील माळी, सामाजिक न्याय विभागीय अध्यक्ष रमेश बहारे, माजी नगरसेवक राजू मोरे यांच्यासह मोहसीन शेख, सलीम शेख, सईद खान, राजा मिर्झा, जोहेद शेख आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मजहर पठाण यांनी यापूर्वीही जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. फेरनिवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.






