मासेमारीसाठी आठ तलाव ठेक्याने देणार, ई-निविदा प्रक्रिया सुरू

महा पोलीस न्यूज । दि.१९ जुलै २०२५ । जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाकडून मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले आठ तलाव आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी (२०२५-२६ ते २०२९-३०) मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात येत असून, यासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या ठेक्याच्या अधीन येणाऱ्या तलावांची यादी पुढीलप्रमाणे आहे –
१) मोर (९६.०० हेक्टर),
२) को.प. बंधारा (४४.९७ हेक्टर),
३) शहापूर (४७.०० हेक्टर),
४) खडकेसिम (३०.०० हेक्टर),
५) लोणीसिम (३५.३६ हेक्टर),
६) शेळावे (२७.०० हेक्टर),
७) दहिगाव बंधारा (२३९.०० हेक्टर)
८) शिरसमणी (७३.०० हेक्टर).
या तलावांच्या मासेमारी ठेक्यासाठी सविस्तर माहिती आणि अटी http://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, सहकारी संघ, मच्छीमार, मत्स्य संवर्धक, खाजगी उद्योजक किंवा वैयक्तिक व्यक्तींनी सदर संकेतस्थळावरून ई-निविदा सादर कराव्यात, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), जळगाव अ.रा. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.