खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद
महा पोलीस न्यूज | ७ जून २०२४ | पहुर पोलीस ठाणे अंतर्गत २०१० मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना आरोपीने पैठण कारागृहातून मे महिन्याच्या अखेरीस पळ काढला होता. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुप्त माहितीवरून हिवरखेडा गावातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सन २०१० मध्ये पहुर पोलीस स्टेशन हददीतील हिवरखेडा ता. जामनेर या गावात सुलतान भिकन तडवी याने पैशाच्या देवाणघेणाचीचे कारणावरुन त्याचे शालक याचा खुन केला होता. याप्रकरणी पहुर पोलीस स्टेशन भाग-५ गुरन.९७/२०१० भादवि.क.३०२ गुन्हा दाखल करुन त्याबाबत दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आलेले होते. फौजदारी खटला सेशन केस न.१८८/२०१० नुसार जिल्हा सत्र न्यायालयात चालविण्यात आला असता त्यात सुलतान भिकन तडवी यास जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेली होती.
खुनाच्या गुन्ह्यात आरोपी सुलतान भिकन तडवी वय ५३ रा.हिवरखेडा ता.जामनेर हा पैठण कारागृहात शिक्षा भोगत असतांना पैठण कारागृहातुन दि.३० मे रोजी पळुन गेला होता. आरोपीबाबत वरीष्ठांना गोपनिय बातमी मिळाल्याने आरोपी सुलतान भिकन तडवी यास ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढील कारवाई करीता पोलीस पथकासह रवाना करण्यात आलेले आहेत.
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचना व मार्गदर्शनावरुन हवालदार विनोद संभाजी पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांनी केली आहे.