कारवाई : चाळीसगाव पोलिसांनी पकडला १० लाखांचा गांजा
महा पोलीस न्यूज । १७ जून २०२४ । चाळीसगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करीत गांजा विक्री करणाऱ्या एकाला अटक केली. संशयीताकडून ५० किलो ३१५ ग्रॅम वजनाचा सुमारे १० लाख ६ हजारे ३०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच १२ लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. अशोक भरतसिंग पाटील (वय ५४, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप पाटील यांना संशयीत अशोक पाटील हा वाहनातून गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी लागलीच पथकाला कारवाईचे निर्देश दिले. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शिक्षक कॉलनीत पोलिसांनी छापेमारी करीत संशयीताच्या वाहनातून सुमारे १० किलो तसेच त्याच्या घरातून ४० किलो असा १० लाखांचा गांजा जप्त केला. पथकाने संशयीताला ताब्यात घेत १२ लाखांचे वाहनही जप्त केले.
पथकाने केली कारवाई
संपूर्ण कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, हवालदार सुभाष घोडेस्वार, राहुल सोनवणे, हवालदार विनोद भोई, नाईक महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे, पवन पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर गीते, मनोज चव्हाण, राकेश महाजन, रवींद्र बच्छे, महिला शिपाई स्नेहल मांडोळे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.