वकील संरक्षण कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्यासंदर्भात निवेदन.
अमळनेर वकील संघातर्फे निवेदन

अमळनेर | पंकज शेटे | 8 जुलै – नाशिक येथील ख्यातनाम वकील अॅड. रामेश्वर बोराडे यांच्यावर नुकताच झालेला भ्याड व अमानुष प्राणघातक हल्ला हा संपूर्ण वकिल बिरादरीच्या दृष्टीने अतिशय धक्कादायक, निंदनीय व चिंतेचा विषय आहे. न्यायव्यवस्थेचा एक अत्यावश्यक व अभिन्न घटक असलेल्या वकिलांवर असे पद्धतशीर हल्ले होणे, ही केवळ त्या व्यक्तीविषयीचा नाही तर संपूर्ण न्यायव्यवस्थेविषयी असलेल्या द्वेषाची लक्षणं आहेत.
आजच्या घडीला अनेक वकील समाजासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. परंतु वकिलांवर वारंवार होणारे हल्ले पाहता, त्यांना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर “वकील संरक्षण कायदा” (Advocate Protection Act) हा महाराष्ट्रात तातडीने लागू होणे अत्यावश्यक ठरते.
आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पुढील मागण्या करण्यात आल्या.
1. अॅड. रामेश्वर बोराडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करण्यात यावा व आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी.
2. राज्यातील सर्व वकील बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून “Advocate Protection Act” हा कायदा तातडीने संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात यावा.
3. जिल्हा व तालुका स्तरावर वकील सुरक्षेसाठी विशेष समित्या स्थापन करण्यात याव्यात.
4. वकिलांवर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध जलदगतीने खटले चालवून कठोर शिक्षा करण्यात यावी.
वकील संघ, अमळनेर तालुका, जिल्हा जळगाव यांच्यावतीने आम्ही या निवेदनाद्वारे आपल्या मार्फत महाराष्ट्र शासनाला विनंती करण्यात आली. निवेदन देतेवेळी ॲड. किरण पाटील अध्यक्ष अमळनेर वकील संघ तसेच ॲड आर.आर.पाटील, ॲड आर . वी.निकम, ॲड माधव बॅडगुजर, ॲड सुरेश सोनवणे. ॲड दिनेश पाटील ॲड किशोर डी .पाटील ॲड अमजद खान . ॲड सुशील जैन. ॲड आर. ए.निकुंभ. ॲड डी. पी.परमार. ॲड उमेश पाटील ॲड डी y पाटील ॲड y p पाटील ॲड जगदीश बडगुजर. आदी उपस्थित होते.