
जळगाव – येथील कु. आश्लेषा राजेश यावलकर हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतली आहे. ASPA म्हणजेच अमेरिकन सोसायटी फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेतला.
या परिषदेत “शिक्षण क्षेत्रात AI चा नैतिक दृष्टीने वापर” या विषयावर आश्लेषाने अभ्यासपूर्ण संशोधन करून प्रबंध सादर केला. संपूर्ण भारतातून अश्लेषा यावलकर एकमेव प्रतिनिधित्व करत होती. विशेष कौतुक म्हणजे सर्वात कमी वयाची शोध प्रबंध सादर करणारी ती एकमेव होती. अहमदाबाद येथील पंडित दीनदयाल एनर्जी युनिव्हर्सिटी PDEU मार्फत भारताचे प्रतिनिधित्व करत आश्लेषाने वॉशिंग्टन डीसी येथे ASPA मध्ये पेपर प्रेझेंटेशन केले. अनेक देशातून आलेल्या प्रोफेसर , प्राध्यापक आणि डॉक्टरेट असलेल्या मान्यवरांसमोर आश्लेषाने शिक्षण क्षेत्रात AI चा नैतिक दृष्टीने वापर या विषयावर आपले अभ्यासपूर्ण शोध पेपरचे सादरीकरण केले. 27 मार्च ते 1 एप्रिल 2025 दरम्यान सदर आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली.
या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या डिबेट स्पर्धेत आश्लेषाने पहिले पारितोषिक मिळवून संपूर्ण कॉन्फरन्सचे लक्ष वेधले. यापूर्वी देखील PDEU मार्फतच श्रीलंका आणि चीन येथे भारतातर्फे आश्लेषाने प्रतिनिधित्व केलं आहे. आपल्या विद्यार्थी जीवनात ग्रॅज्युएशनच्या तीन वर्षांमध्ये तीन वेळा आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळवणारी आश्लेषा एकमेव विद्यार्थिनी असून तिची ही वाटचाल बघून बुद्धी कौशल्याची दाद द्यावीशी वाटते. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये Mayflower या पंचतारांकित हॉटेल मध्ये अनेक दिग्गजांसमोर आश्लेषाने आपला शोध प्रबंध सादर केला. ही पंचतारांकित हॉटेल व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डिंगच्या अगदी जवळ होती.
अश्लेषाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरणे जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी देखील ही अभिमानाची बाब आहे. Aspa आयोजित आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सच्या पूर्वतयारीसाठी रेड्डी सर, श्रीराम सर, दुष्यंत दवे सर आणि विद्यापीठाचे डायरेक्टर ए के सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले.