वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप; युवा नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी…

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप; युवा नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी…
सावखेडा, ता. अमळनेर : सामाजिक कार्यातून जनतेशी नाळ जोडणारे युवा कार्यकर्ते श्री.पुष्कराज भरतराव कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा, सावखेडा येथे विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.
पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना होणारा त्रास लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना छत्र्यांसह गोडधोडाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य, पालक, ग्रामस्थ तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.उपस्थितांनी श्री.पुष्कराज भरतराव कदम यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना श्री. पुष्कराज कदम म्हणाले, “राजकारण हे केवळ निवडणुकांपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे हीच खरी लोकसेवा आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, युवकांच्या प्रगतीसाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही विविध लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविणार आहे.”
सावखेडा परिसरात श्री. पुष्कराज भरतराव कदम हे सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे उपक्रम राबवत असून त्यांच्या या उपक्रमाची नागरिकांकडून सर्वत्र प्रशंसा होत आहे…





