
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । आगामी नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असताना प्रभाग क्रमांक १४ मध्ये नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी वेग घेत आहे. यामध्ये सौ. ज्योती पंकज शेटे (एम.ए. पॉलिटिक्स, बी.एड.) या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, नागरिकांकडून त्यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे.
ज्योती शेटे या पंकज संतोष शेटे यांच्या पत्नी असून, सुशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेल्या महिला म्हणून त्यांची ओळख आहे. सामान्य कुटुंबातील असल्याने प्रभागातील दैनंदिन समस्या, गरिबांचे प्रश्न आणि स्थानिक गरजा यांची त्यांना प्रत्यक्ष जाण असल्याचे नागरिक सांगत आहेत.
नागरिकांचा विश्वास : “आमच्यातीलच प्रतिनिधी हवा”
नागरिकांचे म्हणणे आहे की आतापर्यंत प्रभागात निवडून येणारे प्रतिनिधी जनतेच्या दैनंदिन समस्यांपासून दूर राहिले. पाणी, रस्ते, गटारे, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत समस्यांवर स्थानिक जनता दीर्घकाळ नाराज आहे. “आम्हाला यावेळी फक्त जनप्रतिनिधी नको, तर जनसेवक हवा आहे. पंकज शेटे हे वर्षभर लोकांच्या मदतीला धावून येतात आणि त्यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. सौ. ज्योती शेटे या त्या सेवाभावाला दिशा देतील,” असे एका नागरिकाने सांगितले.
महिला सक्षमीकरण व विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी
सौ. ज्योती शेटे यांच्या उमेदवारीतून प्रभागाला खालील क्षेत्रांत ठोस काम अपेक्षित असल्याचे नागरिकांचे मत आहे:
- महिला सक्षमीकरण:
महिला बचत गटांचे बळकटीकरण, कौशल्य विकास कार्यक्रम आणि महिलांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करणे. - आरोग्य सुविधा:
स्थानिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण, आरोग्य शिबिरांचे आयोजन आणि आरोग्य जनजागृती. - शिक्षण:
होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, डिजिटल शिक्षणाची सोय आणि शाळांमध्ये उन्नत सुविधा. - स्वच्छता व शौचालये:
सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था सुधारणा, स्वच्छ शौचालयांची उपलब्धता आणि देखभाल व्यवस्था. - समाजकार्य:
वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी विविध सामाजिक कल्याण योजना राबविणे.
कै.संतोष सोनू शेटे यांच्या कार्यपरंपरेचा वारसा
शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रात विशेष योगदान देणारे कै. दादासो. संतोष सोनू शेटे यांची लोकसेवा आणि सूचक कार्यपद्धती यांची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी आता शेटे परिवारातील पुढील पिढीवर येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
परिवर्तनाचा मार्ग अधिक स्पष्ट
यंदा प्रभाग क्रमांक १४ मध्ये परिवर्तनाची लाट पाहायला मिळत असून, नागरिकांमध्ये एकच भावना ठळकपणे उमटत आहे. “या वेळी काम करणारा, लोकांमध्ये मिसळणारा आणि प्रामाणिक सेवाभाव असलेला प्रतिनिधी हवा.” या पार्श्वभूमीवर सौ. ज्योती पंकज शेटे या मजबूत दावेदार म्हणून उदयास येत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.






