Social
अमळनेर नगरपालिका पथ विक्रेता समिती जाहीर: तिघांची बिनविरोध निवड

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर नगरपरिषदेने नुकतीच पथ विक्रेता समिती जाहीर केली असून, यात असलम युनुस बागवान, जोहरा बी सलीम बागवान आणि महेमुदा बी चांद बागवान या तिघांची बिनविरोध निवड झाली आहे. हे तिघेही अमळनेरच्या बागवान समाजातील आहेत.
या निवडीबद्दल शहरातून विविध स्तरांतून अभिनंदन व्यक्त होत आहे. ही समिती पथ विक्रेत्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे योग्य निर्णय घेण्यासाठी काम करणार आहे.