Social

महानगरपालिकेतर्फे  5 व्या ”खान्देश महोत्सव 2025  चे आयोजन

जळगाव प्रतिनिधी:– महिला बचत गटांसह इतर उद्योजक व व्यावसायिकांना प्रोत्साहीत करण्यासाठी तसेच खान्देशच्या स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आणि या भूमीला लाभलेल्या इतर प्रकारच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी एक खात्रीशीर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने , जळगाव महापालिकेतर्फे 3 ते 7 जानेवारी 2025 या कालावधीत ” खान्देश महोत्सव – 2025 चे ” आयोजन करण्यात आले आहे. 3 जानेवारी रोजी सायं. 6.00 वा. सदर महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय राज्यमंत्री , क्रीडा व युवक कल्याण विभाग ,  रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते होणार असून , महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मा. . गुलाबभाऊ पाटील , वस्त्रोद्योग मंत्री. संजय सावकारे ,खासदार  श्रीमती स्मिताताई वाघ , . आमदार . राजूमामा भोळे , जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद , पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आदी मान्यवर  उपस्थित राहणार आहेत . या प्रसंगी सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री ऋतुजा शिंदे यांची सिलेब्रेटी म्हणून विशेष उपस्थिती असणार आहे.

बॅरिस्टर निकम चौक , सागर पार्क याठिकाणी स. 10 ते रात्री 10 या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात , महिला बचत गटांच्या उत्पादनांपासून ते नामांकित ब्रँड्सच्या उत्पादनांपर्यंतचे स्टॉल्स असतील , आगामी गुलाबी थंडीच्या दृष्टीने विंटर झोन , फॅशन झोन , पर्यावरणपूरक लाईफ स्टाईलसाठी ‘माझी वसुंधरा ‘ विभाग असे विविध रंजक विभाग असतील , बच्चे कंपनीला मज्जा करण्यासाठी आकर्षक किड्स झोन, आणि खवय्यांसाठी विविध पदार्थांची खाद्यजत्राही भरणार आहे. एकंदरीत बालगोपाळांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठीच्या असंख्य बाबींची या महोत्सवात रेलचेल असणार आहे. इतरांना प्रेरणा देण्यासाठी , अनेकांच्या प्रगतीला हातभार लावण्यासाठी , सामाजिक दायित्वाच्या संवेदनेतून यात सहभागी व्हावे , सहकुटुंब -सहपरिवार खान्देश महोत्सवाला भेट द्यावी , भरपूर आनंद घ्यावा असे आवाहन , जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. ज्ञानेश्वर ढेरे व अधिकारी — कर्मचारी वृंदाच्या वतीने करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button