विद्याविहार कॉलनीत ठाकरे व्हिला शेजारी आग; जीवितहानी टळली

विद्याविहार कॉलनीत ठाकरे व्हिला शेजारी आग; जीवितहानी टळली
अमळनेर प्रतिनिधी
विद्याविहार कॉलनी, येथे ठाकरे व्हिला शेजारी असलेल्या रवींद्र मोतीराम पाटील यांच्या घराला घरबंद असल्याने अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना व अग्निशमन विभागाला कळवले. काही वेळातच पो.कॉ सुनील तेली , पो .कॉ सूर्यकांत साळुंखे व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळवले.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घरातील काही भागाचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस व अग्निशमन विभाग याबाबत पुढील तपास करीत आहेत.
स्थानिक नागरिकांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे.






