
अमळनेर येथील होमगार्डचा प्रामाणिकपणाचा ; हरवलेल्या मोबाईल केला परत..
अमळनेर प्रतिनिधी : सत्यमेव जयते या ओळखीला खरं ठरवत अमळनेर पथकातील होमगार्ड गणेश लांडगे यांनी प्रामाणिकतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.
मंगरूळ येथील गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळेस ड्युटीवर असताना त्यांना एक मोबाईल सापडला. कोणताही मोह न बाळगता त्यांनी चौकशी सुरू केली. शोधाशोधीनंतर समजले की तो मोबाईल पातोंडा नांद्री येथील रावशा देविदास भिल या गरीब कुटुंबातील मुलाचा आहे.
मोबाईल परत मिळाल्याच्या क्षणी रावशा भावुक झाला. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने सांगितले, “हा मोबाईल हरवल्यापासून मी दोन दिवस अन्नाचे घासही घेतले नाहीत. शेतातील कष्टाच्या पैशातून तो विकत घेतला होता. आज मोबाईल परत मिळाल्याने माझी दुनिया पुन्हा उजळली आहे.”
गणेश लांडगे यांच्या या सचोटीच्या कार्याने अमळनेर पोलीस,होमगार्ड संघटना आणि नागरिक समाजाचे मान उंचावले आहे. त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.






