सेवार्थ प्रणालीतील त्रुटी दूर ; आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला

सेवार्थ प्रणालीतील त्रुटी दूर – आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला
जळगाव, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आस्थापनेवरील मंजूर पदांची माहिती सेवार्थ प्रणालीवर अद्ययावत नसल्यामुळे काही कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या सहा महिन्यांपासून निर्माण झाला होता.या बाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सदरचा प्रश्न सोडविण्याबाबत सूचना देण्यासोबतच स्वत मंत्रालय स्तरावर या बाबत पाठपुरावा देखील केला होता.
या बाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सातत्याने मुंबई येथील संबंधित कार्यालयाशी पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश मिळून प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रक्रियेला आता गती मिळाली आहे.
या समस्येचे निराकरण झाल्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून, प्रशासकीय कामकाज अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
या कार्यवाहीसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अधिकारी व तांत्रिक पथकाने विशेष प्रयत्न केले.






