निमा (NIMA) अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी डॉ. हेमंत कदम यांची नियुक्ती

निमा (NIMA) अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी डॉ. हेमंत कदम यांची नियुक्ती
अमळनेर प्रतिनिधी आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांच्या रजिस्टर्ड संघटनेची नॅशनल इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अमळनेर तालुका नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून सर्वानुमते पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी डॉ. हेमंत कदम, उपाध्यक्ष डॉ. सचिन पाटील (काटे), सचिव डॉ. उमेश सोनवणे, सहसचिव डॉ. अक्षय न्हाळेदे, कोषाध्यक्ष डॉ. हितेश मोरे, प्रचारक तथा समन्वयक डॉ. पंकज चौधरी, तर महिला समन्वयकपदी डॉ. पुजा पंजवाणी (वाघुले) यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, नवीन वैद्यकीय धोरणांवर चर्चासत्रे घेणे, डॉक्टरांच्या हक्कांसाठी ठामपणे आवाज उठवणे तसेच वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.






